Body Pain Causes : तुम्हाला अंगदुखी जाणवते का? यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. बरेच जण अशा वेदनांकडे दुर्लक्ष करतात. खूप वेळ एका स्थितीत बसल्यामुळे किंवा झोपल्यामुळे अशी वेदना होत असेल असा अंदाज वर्तवला जातो. पण असे दुर्लक्ष केल्याने समस्या आणखी वाढू शकते. शरीरात सतत वेदना होत असेल तर वेळीच त्यावर उपचार करण्याचा सल्ला तज्ञांकडून दिला जातो. कोणत्या कारणांमुळे शरीरात सतत वेदना जाणवू शकते जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अपूर्ण झोप
निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक असते. दररोज ६ ते ८ तासांची झोपण्याचा सल्ला दिला जातो. आपण झोपलेले असताना एनर्जी रिसोर्स नव्याने तयार होतात. त्यामुळे पुरेशी झोप झाली नाही तर थकवा जाणवतो. तसेच यामुळे शरीरात वेदना देखील जाणवु शकते.

पाण्याची कमतरता
शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास वेदना जाणवू शकते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते, जे निरोगी राहण्यासाठी आवश्यक असते. शरीरात पाण्याची कमतरता निर्मर झाल्यास थकवा आणि शारीरिक वेदना जाणवू शकते.

Health Tips : गरम पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो जाणून घ्या

तणाव
तणाव अनेक आजरांना आमंत्रण देते. तणाव असणाऱ्या व्यक्तींना नेहमी थकवा जाणवतो असे निदर्शनास आले आहे. तसेच तणावामुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन अंगदुखी सारखी समस्या उद्भवू शकते.

आयरनची कमतरता
शरीरात आयरनची कमतरता झाल्यास काही भागांमधील ऑक्सीजन आणि पोषक तत्त्वांचा पुरवठा कमी होतो. ज्यामुळे थकवा आणि अंगदुखी जाणवते.

‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता
शरीरात ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता असेल tar तुम्हाला अंगदुखीचा त्रास होऊ शकतो.

आर्थराइटिस
जर तुम्हाला आर्थराइटिस झाला असेल तर यामध्ये अंगदुखी होते. त्यामुळे अंगदुखीचे लक्षण ओळखून यावर तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्या.

आणखी वाचा : रात्रीच्या जेवणात ‘या’ पदार्थांचा समावेश चुकूनही करू नका; ठरतील आरोग्यास धोकादायक

फटीग सिंड्रोम
पुरेशी झोप घेतल्यानंतर देखील थकवा किंवा अंगदुखी दूर होत नसेल, तर हे फटीग सिंड्रोमचे लक्षण असू शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These can be the reasons behind your body pain know more pns