आपण अनेकदा महिन्याचे किराणा सामान खरेदी करताना गरजेपेक्षा जास्त सामान विकत घेतो. जर कधी पाहुणे मंडळी अचानक घरी आली किंवा एखाद्या विशेष मेजवानीचे आयोजन करायचे अचानक ठरले तर यासाठी अधिकचे सामान विकत घेतले जाते. पण यातील काही वस्तु वेळेत वापरल्या नाहीत तर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा वस्तुंच्या एक्सपायरी डेटची चिंता महिला वर्गाला सतावत असते. पण स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या काही वस्तुंना एक्सपायरी डेट नसते म्हणजे त्या वस्तु वापरण्याचा कोणताही ठराविक कालावधी नसतो. कोणत्या आहेत त्या वस्तु जाणून घेऊया.
व्हिनेगर
व्हिनेगरचा वापर अनेक प्रकारे केला जातो. लोणचे बरेच दिवस टीकावे यासाठी त्यात व्हिनेगर मिसळले जाते. याशिवाय काही खाद्यपदार्थांना अधिक चविष्ट बनवण्यासाठी त्यात व्हिनेगर टाकले जाते. यासाठी व्हिनेगर बहुतांश घरात असतेच. ते लवकर खराब होत नाही. त्यामुळे एक्सपायरी डेटनंतरही व्हिनेगर वापरता येते.
आणखी वाचा : तुम्हाला सतत तहान लागते का? हे असु शकते गंभीर आजाराचे लक्षण; लगेच जाणून घ्या
साखर
साखर दीर्घकाळ वापरता येते. अनेक वेळा तुम्हाला साखरेच्या पाकिटावर दोन वर्षांपर्यंतची एक्स्पायरी डेट लिहिलेली दिसेल. पण जर साखर एअर टाईट डब्यात व्यवस्थित साठवली तर ती वर्षानुवर्षे टिकते.
मध
योग्य प्रकारे साठवलेला मध वर्षानुवर्षे खराब होत नाही. त्यासाठी मध एअर टाईट डब्यात व्यवस्थित साठवावा लागतो. मधामध्ये आम्लयुक्त पीएच कमी असतो, त्यामुळे त्यामध्ये बॅक्टेरिया वाढत नाहीत आणि तो दीर्घकाळ टिकतो.
पास्ता
पास्ता हवाबंद डब्यात व्यवस्थित ठेवला तर तो वर्षानुवर्षे टिकु शकतो. फक्त इतर कोणत्या पदार्थाला जर कीड लागली असेल तर ती कीड पास्त्याला लागणार नाही याची काळजी घ्या.
आणखी वाचा : अंडी उकडताना फुटू नयेत किंवा खराब होऊ नयेत यासाठी करा हे उपाय
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)