भारतासह जगभरात मधुमेह असणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आपण या आजाराला बळी पडू नये यासाठी सध्या तरुण मंडळी तब्बेतीकडे विशेष लक्ष देत असल्याचे जाणवते. तर ज्यांना हा आजार झाला आहे ते अधिक फिट राहण्याच्या प्रयत्नात असतात. मधुमेह असणाऱ्या रुग्णांना आहाराची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण जेवणातील काही पदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते.

काहीजण मधुमेह टाळण्यासाठी तब्बेतीची विशेष काळजी घेतात, पण तरीही ते या आजाराला बळी पडतात. यामागे आनुवंशिकता हे एक कारण असू शकते, याशिवाय रोजच्या काही सवयी देखील मधुमेह होण्यास कारणीभूत ठरू शकतात. कोणत्या आहेत त्या सवयी जाणून घ्या.

Fast Charging Ruin Your Phone Battery
Fast Charging Hurt Your Phone Battery: फास्ट चार्जिंगमुळे होऊ शकते तुमच्या फोनचे नुकसान? ‘या’ पाच समस्यांबद्दल आजच जाणून घ्या
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Tips To Measure Your Blood Pressure
Tips To Measure Your Blood Pressure : रक्तदाब तपासण्याची योग्य पद्धत कोणती, हात कसा ठेवावा? अचूक रीडिंग टाळण्यासाठी डॉक्टरांनी सांगितल्या ‘या’ टिप्स
kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
How exercising for 2-3 days may help reduce risk of Alzheimer’s Alzheimer Disease exercise
व्यायामामुळे ‘अल्झायमर’चा धोका कमी होऊ शकतो; डॉक्टरांनी सांगितले व्यायाम प्रकार

आणखी वाचा : सर्दी, घशात खवखवणे या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करतील ‘हे’ घरगुती उपाय

खूप वेळ एकाच ठिकाणी बसून राहणे
खूप वेळ एकाच ठिकाणी बसून राहिल्याने मधुमेह होण्याचा धोका वाढतो. ऑफिसमध्ये किंवा घरी असताना खूप वेळ एकाच ठिकाणी बसून राहणे टाळा, कामाच्या मध्ये थोडा ब्रेक घेऊन चालण्याची सवय लावा.

जेवणात रिफाइंड कार्ब्सचा अतिरेक
जेवणामध्ये रिफाइंड कार्ब्सचा अतिरेक झाल्यास मधुमेह होण्याची शक्यता वाढते. रिफाइंड कार्ब्सऐवजी कॉम्प्लेक्स कार्ब्सचा आहारात समावेश करण्याचा सल्ला तज्ञ देतात. यासाठी पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन राईस, पांढऱ्या ब्रेडऐवजी ब्राऊन ब्रेड असे पर्याय निवडु शकता.

पुरेशी झोप न घेणे
पुरेशी झोप न घेतल्यास मधुमेह होण्याचा धोका वाढू शकतो.

अतिसाखर असणाऱ्या ड्रिंक्सचे सेवन
काही रेडीमेड ड्रिंक्समध्ये अतिसाखर वापरण्यात येते, अशा ड्रिंक्सच्या अतिसेवनाने मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

Health Tips : पालक व मेथीमध्ये कोणती भाजी खाणे ठरते अधिक फायदेशीर? जाणून घ्या याचे आरोग्याला होणारे फायदे

धूम्रपान
अमेरिकेतील ‘सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रीवेंशन’ या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार धूम्रपान केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहणे कठीण होते. धूम्रपान केल्यामुळे टाईप २ मधुमेह होण्याचा धोका वाढतो. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना इतर व्यक्तींपेक्षा मधुमेह होण्याचा धोका ३० ते ४० टक्के जास्त असतो.