मधुमेहापासून बचाव करायचा असेल तर आपल्याला आपल्या खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. मधुमेहाच्या रुग्णांनी जर योग्य आहार घेतला नाही तर त्यांचे शरीर कमकुवत होऊ लागते. शरीराला निरोगी आणि फिट ठेवण्यासाठी ड्रायफ्रूट्सचे सेवन फायदेशीर ठरते. परंतु सर्वच ड्रायफ्रूट्स मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त नसतात. काही ड्रायफ्रूट्सचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू लागते.
मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रित करण्यासोबतच शरीराला फिट ठेवण्यासाठी अशा ड्रायफ्रूट्सचे सेवन करावे ज्यांनी रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहील. मधुमेह हा आहारातील निष्काळजीपणामुळे बळावणारा आजार आहे. यात रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवले नाही तर अनेक आजार आपल्याला त्रास देऊ शकतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ड्रायफ्रूट्स हा एक उत्तम पर्याय आहे परंतु सर्वच ड्रायफ्रूट्स या रुग्णांसाठी योग्य नाहीत. तर जाणून घेऊया कोणते ड्रायफ्रूट्स रक्तातील साखर वाढवण्यास कारणीभूत ठरतात आणि कोणत्या ड्रायफ्रूट्सचे सेवन या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.
Post COVID-19 Diet : कोविड-१९ मधून बरे झाल्यानंतर चुकूनही खाऊ नका ‘या’ गोष्टी; होऊ शकते मोठे नुकसान
नुकसान पोहचवणारे ड्रायफ्रूट्स
मनुके : मनुक्यांचे सेवन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे त्यांनी मनुक्यांचे सेवन करू नये.
रक्तातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी मधुमेह रुग्णांनी या ड्रायफ्रुट्सचे करावे सेवन
अक्रोड : मधुमेहाच्या रुग्णांसाठी अक्रोड अतिशय फायदेशीर आहे. व्हिटॅमिन-ई युक्त अक्रोडमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते. हे कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवते. अनेक अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की मूठभर अक्रोड खाल्ल्याने टाइप २ मधुमेह ४७ टक्क्यांनी कमी होतो.
बदाम : मधुमेह रुग्णांसाठी बदामाचे सेवन अत्यंत फायदेशीर असून अनेक अभ्यासांमध्ये हे समोर आले आहे की बदाम खाल्ल्याने शरीरात इन्सुलिन तयार होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
Health Tips : मधुमेहावर ‘या’ चार औषधी वनस्पती ठरतात रामबाण उपाय; रक्तातील साखर ठेवतात नियंत्रणात
काजू : काजू एक असे ड्रायफ्रूट आहे जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते. काजूचे सेवन केल्याने कॉलेस्ट्रॉल स्थिर राहते ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. काजू खाल्ल्याने मधुमेही रुग्णांची साखर नियंत्रणात राहते, असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. २०१८ च्या अभ्यासात, संशोधकांनी टाइप २ मधुमेह असलेल्या ३०० रुग्णांना काजू खाण्यास दिले. अभ्यासात असे आढळून आले की, ज्या रुग्णांनी काजू खाल्ले त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते.
पिस्ता : मधुमेह रुग्णांच्या आहारात पिस्त्याचे सेवन करावे. या रुग्णांसाठी पिस्ता उत्तम आहे. पिस्त्यामध्ये फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन सी, झिंक, कॉपर, पोटॅशियम, लोह, कॅल्शियम यांसारखे पोषक घटक असतात, जे शरीर निरोगी ठेवतात.