Trigger Foods For Smoking: नवीन वर्षाच्या सुरुवातीला किंवा एखाद्या खास औचित्याला साधून आपणही जर का धूम्रपान बंद करण्याच्या विचारात असाल तर आजचा हा लेख आपल्या खूपच कामाचा आहे. असं म्हणतात की कोणत्याही प्रश्नावर उत्तरं शोधताना आधी तो प्रश्न काय आहे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळेच धूम्रपान बंद कसं करावं हा प्रश्न सोडवण्यासाठी आधी तुम्हाला धूम्रपान का करावंसं वाटतं हे समजून घ्यायला हवं. यासाठीच आज आपण धूम्रपानाशी संबंधित काही ट्रिगर फूड्स आणि त्यांचे पर्याय जाणून घेणार आहोत.

उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की काही खाद्यपदार्थांमध्ये सुद्धा निकोटीन असते अर्थात तंबाखूच्या तुलनेत पातळी खूपच कमी असली तरी, त्यांचे सेवन केल्याने निकोटीनची सवय लागू शकते. या पदार्थांनाच ट्रिगर फूड्स म्हणून ओळखले जाते .

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
impact of new year resolutions
संकल्पांचे नवे धोरण
loksatta editorial on rupee getting weaker day by day against the dollar
अग्रलेख : बबड्या रुपया, कारटा डॉलर

ट्रिगर फूड्स म्हणजे काय?

ट्रिगर फूड्स म्हणजे थोडक्यात असे पदार्थ जे तुमच्या जिभेची लालसा वाढवतात. अगदी वजन वाढण्यापासून ते धूम्रपान, मद्यपानाची सवय लागेपर्यंत अनेक गोष्टींच्या मागे हे ट्रिगर फूड्स मुख्य कारण असतात. कारण यामुळेच तुम्हाला एखादा पदार्थ खाण्याची किंवा त्याला पर्यायी व्यसनाची ओढ लागते. जर या नवीन वर्षात आपण येतील एखादी सवय दूर करू इच्छित असाल तर आधी हे ट्रिगर फूड्स ओळखणे खूप महत्त्वाचे आहे. एकता सिंघवाल यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार धुम्रपानाला प्रोत्साहन देणारे काही ट्रिगर फूड्स खालीलप्रमाणे:

कॅफिनचे अतिसेवन

कॅफीन आणि निकोटीन या दोघांचे व्यसन अगदी सहज लागू लागते. हे दोन घटक अनेकदा एकमेकांना जोडूनच असतात. बर्‍याच धूम्रपान करणाऱ्यांसाठी, एक कप कॉफी किंवा चहा आणि सिगारेट हे आवडीचं किंबहुना सवयीचं समीकरण असतं. जास्त प्रमाणात कॅफीन सेवन केल्याने सिगारेट ओढण्याची लालसा पुन्हा वाढू शकते.

पर्याय – हर्बल टी, डिकॅफिनेटेड कॉफी निवडा किंवा हळूहळू कॅफिनचे सेवन कमी करा.

दारू

मद्यपान आणि धूम्रपान अनेकदा एकत्र केलं जातं. दारूमुळे संवेदना कमी होत असताना कोणत्याही गोष्टीला प्रतिकार करण्याची शक्ती सुद्धा कमी होऊ लागते परिणामी अगोदरच धूम्रपान करत नसलेल्या व्यक्तीला सुद्धा धूम्रपान करण्याच्या इच्छेचा प्रतिकार करता येत नाही.

पर्याय: नॉन-अल्कोहोलिक पेये निवडा किंवा मद्यपान बंद करताना टप्प्याटप्प्याने प्रमाण कमी करत जा.

साखरेचे स्नॅक्स

धूम्रपान किंवा अन्य व्यसने सुद्धा जिभेच्या चोचल्यांशी जोडलेली असतात. काहींना अत्यंत गोड खाण्याची सवय असते, काहींना सतत चघळत राहण्याची सवय असते. अनेकदा ही लालसा कमी करण्यासाठी सुद्धा सिगारेटचा पर्याय जवळ केला जातो.

पर्याय: फळे, भाज्या किंवा नट यांसारखे आरोग्यदायी स्नॅक्स निवडा.

फॅट्सयुक्त पदार्थ

काही फॅट्सयुक्त पदार्थ ताणतणाव वाढवू शकतात ज्यामुळे तणाव कमी करण्यासाठी सिगारेटची लालसा वाढू शकते.

पर्याय: तणाव कमी करण्यासाठी संतुलित आहार घ्या शिवाय योग व ध्यानसाधनेवर भर द्या.

हे ही वाचा<< १०० ग्रॅम आवळा तुमच्या शरीरात काय बदल घडवू शकतो? डायबिटीस असल्यास ‘हा’ गैरसमज आधी सोडवूया

मसालेदार पदार्थ

काहींसाठी, मसालेदार पदार्थांची वाढलेली चव आणि संवेदना धूम्रपानाच्या आठवणी परत आणू शकतात.

पर्याय: पदार्थांची हळुवार चव घ्या. कोणत्याच चवीचा जिभेवर भडीमार करू नका.

Story img Loader