प्रेशर कुकरमध्ये पटकन कोणताही पदार्थ तयार करता येत असल्यामुळे आपले काम खूप सोपे झाले आहे. तरीही असे काही पदार्थ आहेत, जे कधीही कुकरमध्ये शिजवू नये. सिग्नस लक्ष्मी हॉस्पिटलच्या कन्सल्टंट-जनरल फिजिशियन डॉ. संजय सिंग यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, ”प्रेशर कुकर हा अष्टपैलू आणि स्वयंपाकघरातील अत्यंत उपयोगी वस्तू आहे; तर काही प्रकारचे असे पदार्थ आहेत जे कुकरमध्ये बनवण्याऐवजी इतर पद्धतीने बनवणे अधिक योग्य आहे.”

या मर्यादा समजून घेतल्यास आणि वेगवेगळे पदार्थ कसे बनवायचे याबद्दल माहीत असेल तर पदार्थाची चव आणि पौष्टिक मूल्य जपता येते”, असे डॉ. संजय म्हणाले.

Paneer Schezwan Dry Recipe
स्टार्टर्ससाठी घरच्या घरी ट्राय करा ‘पनीर शेजवान ड्राय’ रेसिपी, वाचा साहित्य आणि कृती
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Cucumber raita recipe
बुंदी रायता नेहमीच खाता, यावेळी ट्राय करा काकडी रायता; पटकन वाचा साहित्य आणि कृती
aai kuthe kay karte fame Radhika Deshpande expresses her point about women bindi on forehead
स्त्रीने टिकली लावण्याविषयी ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने मांडलं परखड मत, म्हणाली, “आपण आपली संस्कृती…”
quickly make delicious egg cutlets Read materials and actions
व्हेज कटलेट खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा अंड्याचे स्वादिष्ट कटलेट; वाचा साहित्य आणि कृती
What Poonam Mahajan Said About Pramod Mahajan ?
Poonam Mahajan : ‘प्रमोद महाजन यांना ठार करण्याचं षडयंत्र कशासाठी आखलं गेलं?’ पूनम महाजन यांचं उत्तर, “त्यांना…”

रीरीजेंसी हॉस्पिटल लिमिटेडच्या एमएससी न्यूट्रिशन (गोल्ड मेडलिस्ट), क्लिनिकल डायटीशियन डॉ. श्रद्धा सिंग यांनी स्पष्ट केले की, “या मर्यादांबद्दल जागरूक राहणे आणि योग्य स्वयंपाक तंत्र निवडणे हे तयार केलेल्या जेवणाची सुरक्षा आणि पौष्टिक गुणवत्ता दोन्ही सुनिश्चित करेल.”

म्हणून तज्ज्ञांनी प्रेशर कुकरमध्ये कोणते पदार्थ बनवू नयेत आणि का बनवू नये याबद्दल सांगितले. चला, एकदा जाणून घेवूया.

तळलेले पदार्थ

डॉ. संजय यांच्या म्हणण्यानुसार, कुकरमध्ये तयार होणारा उच्च दाब आणि गरम तेलामुळे मोठा धोका होऊ शकतो, म्हणून पदार्थ तळण्यासाठी प्रेशर कुकर न वापरण्याची शिफारस केली जाते.

“तळण्यासाठी काळजीपूर्वक तापमान नियंत्रण आवश्यक आहे आणि प्रेशर कुकर या उद्देशासाठी डिझाइन केलेले नाहीत. तळण्यासाठी प्रेशर कुकरचा अयोग्य वापर केल्याने मोठा अपघात होऊ शकतो; ज्यामुळे आग लागण्याचा किंवा एखाद्याला भाजण्याचा धोका निर्माण होऊ शकतो”, असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी पुढे सांगितले, ”तळण्यासाठी उपयुक्त डीप फ्रायर किंवा पारंपरिक पद्धती वापरणे अधिक सुरक्षित आहे. जसे की योग्य तापमान निरीक्षणासह कढईमध्ये तळणे.

हेही वाचा – टोमॅटो, बटाटा आणि वांग्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे का? जाणून घ्या आहारतज्ज्ञांकडून….

पटकन शिजणाऱ्या भाज्या

पटकन शिजणाऱ्या भाज्या

डॉ. संजय यांच्या मते वाटाणा यासारख्या भाज्या नाजूक असतात आणि लवकर शिजतात. या भाज्यांसाठी प्रेशर कुकर वापरल्याने त्या जास्त शिजू शकतात आणि त्यांचे रंग आणि पोषक तत्वे नष्ट होऊ शकतात. त्यांनी सांगितले की, “या भाज्या वाफवून किंवा तेलामध्ये परतवण्यासारख्या जलद पद्धती वापरून उत्तम प्रकारे शिजवल्या जातात, ज्यामुळे त्यांचा कुरकुरीतपणा, पोषक तत्वे आणि नैसर्गिक चव टिकून राहण्यास मदत होते”, असे ते म्हणाले.

डॉ. श्रद्धा यांच्या मते पालेभाज्यांच्या बाबतीतही असेच आहे. “त्यांची पौष्टिक अखंडता टिकवून ठेवण्यासाठी, वाफवून घेणे किंवा तेलामध्ये परतून घेणे यासारख्या सोप्या पद्धतींचा वापर करून पालेभाज्या शिजवणे चांगले आहे”, असे त्यांनी स्पष्ट केले.

दुग्धजन्य पदार्थ

डॉ. श्रद्धा यांच्या मते, उच्च दाब आणि तापमानाच्या संपर्कात आल्यावर, दूध किंवा मलईसारखे दुग्धजन्य पदार्थांची चव बदलू शकते. उदाहरण देताना त्यांनी स्पष्ट केले, “जर तुम्ही क्रीमयुक्त सूप बनवत असाल तर, दही किंवा क्रीम वापरा. चवीमध्ये होणारा बदल टाळण्यासाठी प्रेशर कुकरची वाफ निघाल्यानंतर शेवटी दूध किंवा मलई आणि इतर दुग्धजन्य पदार्थ टाकू शकता.

हेही वाचा – पहिला हार्ट अटॅक टाळण्यासाठी ॲस्पिरिन वापरता का? डॉक्टरांकडून जाणून घ्या; ते कसे काम करते?

अंडी

प्रेशर कुकरमध्ये संपूर्ण अंडी त्यांच्या कवचासह शिजवणे धोकादायक असू शकते, असे डॉ. श्रद्धा यांनी सांगितले. “अंड्यांच्या आत अडकलेल्या वाफेमुळे त्यांचा स्फोट होऊ शकतो, ज्यामुळे भाजण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. अंडी प्रेशर कुकरमध्ये शिजवणे टाळणे महत्वाचे आहे.”