वजन वाढण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. बदललेली जीवनशैली, जेवणाचे बिघडलेले वेळापत्रक, पुरेसा व्यायाम न करणे, आहाराकडे दुर्लक्ष, बैठी कामाचे स्वरूप यामुळे वजन लगेच वाढू शकते. वजन वाढले तर ते अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकते. मग अशावेळी व्यायाम, डाएट असे पर्याय निवडून वजन कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. पण कधीकधी तरीही वजन कमी होत नाही. याचे कारण तुमच्या काही सवयी असू शकतात. कोणत्या आहेत त्या सवयी जाणून घ्या.

कमी कॅलरी खाणे

वजन कमी करायचे असेल तर सर्वात आधी जेवणावर जास्तीत जास्त नियंत्रण ठेवले जाते. यामुळे कमी कॅलरीचे सेवन होण्याची शक्यता असते. कमी कॅलरीज खाल्ल्याने थकवा, चिडचिड होणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे अशा समस्या उद्भवू शकतात. तसेच कमी कॅलरी खाल्ल्याने मेटाबॉलिजम रेट कमी होतो. यामुळे शरीरातील चरबी कमी होण्याऐवजी आणखी वाढू लागते. म्हणुन कॅलरीज कमी न खाता योग्य आहार घेणे आवश्यक आहे.

Cooking Tips : कोणतीही भाजी अधिक पौष्टिक बनवण्यासाठी ‘या’ टिप्स ठरतील उपयुक्त

चुकीचे फूड कॉम्बिनेशन

निरोगी जेवणामध्ये ५०% भाज्या, २५% प्रोटीन, २५% कार्बोहायड्रेट असणे आवश्यक असते. यासह ताक किंवा दह्याचा देखील समावेश करू शकता. यामधील कशाचेही प्रमाण कमी झाले तर त्याजागी कार्बोहायड्रेटचे प्रमाण वाढू शकते आणि त्यामुळे शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढून चरबी वाढू शकते.

पुरेशा कॅलरीज बर्न न करणे

पुरेशा कॅलरीज बर्न केल्या नाहीत म्हणजेच व्यायाम करून शरीरातील कॅलरी कमी केल्या नाहीत तर वजन कमी होण्यास अडचण येऊ शकते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही व्यायाम करून कॅलरी बर्न करू शकता. साधारणपणे व्यायामातून १५० ते २५० कॅलरी बर्न करण्याचे टार्गेट ठेऊ शकता.

Navratri 2022 : नवरात्रीच्या उपवासासाठी बनवा ही पेयं; शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी ठरतील उपयुक्त

पुरेसे प्रोटीन न खाणे

वजन कमी करण्यासाठी योग्य प्रमाणात प्रोटीन खाणे आवश्यक असते. प्रोटीन मुळे शरीरातील मेटलबॉलिझम रेट योग्य राहतो, तसेच शरीरातील ऊर्जा टिकून राहते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

Story img Loader