प्रत्येकालाच असे वाटते की आपण सदैव तरुण आणि सुंदर दिसावे. वाढत्या वयात तरुण आणि तंदुरुस्त दिसावे, वाढत्या वयाचा परिणाम आपल्यावर होता कामा नये, अशी प्रत्येकाची इच्छा असते. यासाठी अनेक लोक जिम, डायटिंग आणि अनेक केमिकलने बनलेल्या पदार्थांचे आणि औषधांचे सेवन करतात. हे सगळं करूनही आपल्या अशा काही सवयी आहेत, ज्या आपल्याला अकाली वृद्ध करतात. म्हणूनच सदैव तंदुरुस्त आणि तरुण दिसण्यासाठी आपल्याला आपल्या काही सवयींमध्ये बदल करण्याची गरज आहे.
खाण्याच्या चुकीच्या सवयी:
बरेच लोक त्यांच्या कामाच्या नादात खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाहीत आणि चुकीच्या खाण्यामुळे आपले शरीर वेळेपूर्वी म्हातारे दिसू लागते. उत्तम आरोग्याशिवाय तुम्ही आयुष्यात काहीही करू शकत नाही, त्यामुळे तुम्ही प्रक्रिया केलेले अन्न, सोडा आणि जंक फूडपासून दूर राहिले पाहिजे.
धूम्रपान आणि मद्यपान:
थोडंसं ताणतणाव जाणवलं की अनेकजण व्यसनांशी संबंधित पदार्थांकडे वळतात. यामुळे लोक दारू किंवा सिगारेट सारख्या गोष्टींचे सेवन करू लागतात, या मादक पदार्थांचे सतत आणि जास्त सेवन केल्याने आपण वृद्धत्वाकडे ढकलले जाऊ शकतो. सर्वात चिंतेची बाब म्हणजे तरुणांमध्ये हा ट्रेंड झपाट्याने वाढत आहे.
झोप न लागणे:
दिवसभर काम केल्यावर रात्री झोप चांगली लागते, पण कधी कधी संध्याकाळी चहा किंवा कॉफी प्यायल्यानेही झोप येत नाही. पुरेशी झोप न मिळाल्याचा परिणाम शरीरावर स्पष्टपणे दिसून येतो. त्यामुळे दिवसातून किमान ८ तास झोपण्याचा प्रयत्न करा. याशिवाय दररोज रात्री लवकर झोपून सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी उठण्याचा प्रयत्न करावा. उठल्यावर लगेच २ ग्लास पाणी प्यायल्याने तुमची पचनक्रिया बरोबर राहते.
सूर्यनमस्कार आणि व्यायाम करा:
जर तुम्हाला निरोगी आणि चांगले शरीर हवे असेल तर रोज सकाळी नियमित सूर्यनमस्कार आणि व्यायाम करावा.