आजकाल बहुतेक पालक त्यांच्या लहान मुलांसाठी डायपर वापरतात कारण हे अतिशय सोयीस्कर आहे. प्रवास करताना मुलांना कोरडे ठेवण्याचा हा एक सोपा आणि सोयीस्कर मार्ग आहे. डायपरला कपड्यांप्रमाणे वारंवार धुण्याची गरज नाही, ज्यामुळे काम करणाऱ्या जोडप्यांचा बराच वेळ वाचतो. लहान मुलांसाठी डायपर घालण्याचे अनेक फायदे असूनही, डायपर घालताना तुमच्याकडून झालेली छोटीशी चूकही तुमच्या मुलाच्या आरोग्याला खूप हानी पोहोचवू शकते. या चुका कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • कठोर रसायन असलेल्या डायपरची निवड

काही डायपर निर्माते सिंथेटिक फायबर आणि रसायने वापरतात ज्यामुळे बाळाच्या त्वचेला हानी पोहोचते. ही उग्र रसायने बाळाच्या त्वचेलाही घातक ठरू शकतात. त्यामुळे डायपरची निवड करताना मऊ आणि त्वचेला अनुकूल असे डायपर खरेदी करावेत.

  • हात न धुणे

बाळांना डायपर घालण्यापूर्वी आणि नंतर आपले हात चांगले धुवा. बाळांची त्वचा नाजूक असल्याने त्यांना डायपर घालताना हात स्वच्छ नसल्यास बाळाला अनेक संसर्ग होऊ शकतात.

यकृताची काळजी का आहे महत्त्वाची? अभ्यासातून समोर आली माहिती

  • डायपर बदलण्यास विलंब

लहान मुले दर काही तासांनी डायपर ओले करतात, त्यामुळे त्यांच्या आराम आणि स्वच्छतेसाठी नियमित अंतराने डायपर बदलणे आवश्यक आहे. ओल्या डायपरमध्ये बॅक्टेरियाची वाढ होते ज्यामुळे त्वचेवर पुरळ आणि फोड येऊ शकतात. अशा परिस्थितीत बाळाला पुरळ येण्यापासून वाचवण्यासाठी वेळोवेळी मुलाचे डायपर बदला आणि त्याच्या स्वच्छतेचीही काळजी घ्या.

  • बराच वेळ डायपर घालून ठेवणे

जास्त वेळ डायपर घातल्यानेही बाळाला हानी पोहोचते. रासायनिक उत्पादने, कृत्रिम पदार्थ आणि बॅक्टेरिया बाळाच्या आरोग्यास हानी पोहोचवतात. उग्र रसायने बाळाच्या नाजूक त्वचेत प्रवेश करतात आणि आजारांना कारणीभूत ठरतात.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These mistakes when diapering babies can be harmful change habits immediately pvp