Eat apple in 4 ways : आजारांपासून दूर राहण्यासाठी डॉक्टर सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. दररोज एक सफरचंद खाल्ल्याने व्यक्ती दीर्घकाळापर्यंत आजारांपासून लांब राहतो. सफरचंद खात असताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे नाहितर फायद्यांएवजी नुकसान होण्याची शक्यता असते. सफरचंद प्रत्येक ऋतूत मिळत असले तरी हिवाळ्यात खास करुन चांगले सफरचंद पाहायला मिळतात. सफरचंद अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. ज्यामध्ये आहारातील फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन सी, बी6, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, प्रोटीन, कार्ब आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात. मात्र, आहारतज्ञांच्या मते, सफरचंद खाताना आपण अनेकदा काही चुका करतो. त्यामुळे सफरचंद खाताना या गोष्टींची विशेष काळजी घ्या.
सफरचंद खाण्याची योग्य वेळ कोणती?
ज्या लोकांना गॅस आणि अपचन म्हणजेच पोटाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी रिकाम्या पोटी सफरचंद खाणे टाळावे. जेवणानंतर २ तासांनी सफरचंद खावे.
काही लोक दुग्धजन्य पदार्थांसह सफरचंद खातात. जसे सफरचंद दूध, दही, चीज, लोण्यासोबत खाणे. पण असे करणे टाळले पाहिजे. कारण सफरचंदात सायट्रिक ऍसिड असते जे दुग्धजन्य पदार्थांवर प्रतिक्रिया देऊ शकते. त्यामुळे ते पचण्यात अडचण जाते. तसेच बाजारात मिळणाऱ्याही सफरचंदाचा शेक पिऊ नये कारण ते दुधात मिसळून बनवले जातात. याचा आतड्यांवरही परिणाम होतो. सफरचंद दुधासोबत खाल्ल्याने त्वचेशी संबंधित समस्यांचा धोका वाढते. त्वचा विकार, सोरायसिस, एक्जिमा इ.
सफरचंद कापल्यानंतर जास्त वेळ ठेवू नका
सफरचंद खात असताना एका गोष्टीची काळजी घ्यावी लागते ते म्हणजे कापल्यानंतर लगेचच सफरचंद खावे लागते. अन्यथा त्यावर हळहळू तांबूस व काळा रंग चढू लागतो. बाहेर जाताना सफरचंद कापून नेल्यावर ते काळे पडलेले सफरचंद पाहून खाण्याचा मूडच खराब होतो. अशावेळी सफरचंद कापल्यानंतर ते लगेचच खावे लागते
सफरचंद खाताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?
सफरचंद खाताना सोलून खावे. कारण अनेकदा विक्रेते सफरचंद चमकदार दिसावे म्हणून सालीवर मेण वापरतात. यामुळे फळ खाण्याआधी स्वच्छ धुणे अत्यंत आवश्यक आहे.
हेही वाचा >> Blood sugar control: रक्तातील साखर कमी करण्यासाठी करा ‘हे’ सोपे व्यायाम…शुगर राहील नियंत्रणात
जर तुम्ही तुमच्या मुलाला जेवणाच्या डब्यात सफरचंद देत असाल तर त्यात चिमूटभर मीठ टाका. असे केल्याने सफरचंद पिवळे किंवा तपकिरी होणार नाही. सफरचंद खाण्यापूर्वी ते चांगले धुवा.