Cabbage Worm: आपल्यापैकी अनेकांना कोबीची भाजी खायला खूप आवडते. कोबी ही पोषक घटकांनी समृद्ध अशी भाजी आहे आणि तिच्या चवीमुळे अनेक जण ही भाजी आवर्जून खातात. विशेषत: हिवाळ्याच्या दिवसांत अनेक जण कोबीपासून वेगवेगळे पदार्थ बनवतात; ज्यात कोबी पराठे, बटाटा कोबी करी, कोबी पकोडे इत्यादी पदार्थांचा समावेश असतो. परंतु, तुम्हाला ठाऊक आहे का या भाजीमध्ये सूक्ष्म किडे असतात. हे किड आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. मात्र, ते आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. अशा वेळी या किड्यांना भाजीतून बाहेर काढण्यासाठी काही उपाय फायदेशीर ठरू शकतात.
आज आम्ही तुम्हाला तीन सोप्या टिप्स सांगत आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही कोबीमधील प्रत्येक किडा नष्ट करू शकता.
कोबीमधील किडे काढण्यासाठी कृती खालीलप्रमाणे:
पहिली पायरी
सर्वांत आधी कोबीचे छोटे तुकडे करा आणि नंतर हे तुकडे व्यवस्थित पाहा. असे केल्याने मोठे किडे दिसतात आणि त्यांना बाहेर काढणे सोपे होते.
दुसरी पायरी
आता हे कोबीचे तुकडे एका भांड्यात ठेवून, काही वेळ वाहत्या पाण्याखाली ठेवा आणि हाताने नीट स्वच्छ करा. असे केल्याने किडे बाहेर पडतात.
हेही वाचा: घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
तिसरी पायरी
आता एका टोपात पाणी ओतून, त्यात मीठ, हळद घाला आणि बारीक केलेला कोबी टाकून पाच मिनिटे उकळवा. त्यानंतर कोबीतील पूर्ण पाणी काढून टाकून, त्याची भाजी बनवा. मीठ आणि हळदीच्या गरम पाण्यामुळे सूक्ष्म किडे नष्ट होतील.