हिवाळ्यातील थंड हवेमुळे जशा आरोग्याच्या बारीकसारीक कुरबुरी त्रास देत असतात, तसेच या हवेचा त्वचेवरदेखील परिणाम होत असतो. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे, खाज सुटणे यांसारख्या सामान्य समस्या उदभवतात. या गोष्टी टाळण्यासाठी किंवा त्यांची काळजी घेण्यासाठी अंघोळ करताना या काही महत्त्वाच्या गोष्टींकडे आपले लक्ष असणे गरजेचे असते.
हिवाळ्यादरम्यान आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी अंघोळीच्या पाण्याचे तापमान, अंघोळीदरम्यान आणि नंतर कोणत्या गोष्टी करणे गरजेचे असते हे माहीत असायला हवे. त्यामुळे या काही टिप्स तुम्हाला मदत करू शकतील.
हिवाळ्यासाठी अंघोळीच्या पाच स्टेप्स
१. त्वचेची काळजी घेणारे बॉडी वॉश [मॉइश्चरायजिंग बॉडी वॉश]
थंडीच्या हवेत अंघोळ करताना नेहमीच्या साबणाऐवजी त्वचेची काळजी घेणारे असे बॉडी वॉश निवडावे. अशा वातावरणामध्ये साबण वापरल्यास त्वचेमध्ये असणारे नैसर्गिक तेल निघून जाऊ शकते. त्यामुळे ग्लिसरिन, बटर किंवा हायलारॉनिक अॅसिड [hyaluronic acid] हे घटक असणारे बॉडी वॉश निवडावे.
हेही वाचा : सकाळच्या ‘या’ सवयी ठेवतील तुम्हाला तंदुरुस्त; हिवाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यायची पाहा…..
२. कोमट पाणी
हिवाळ्यात हवा गार असल्याने अंघोळीसाठी आपण शक्यतो गरम पाण्याचा वापर करतो. परंतु, या पाण्यात काही मिनिटांसाठी जरी बरे वाटत असले तरीही त्याचा परिणाम लगेच त्वचेवर होतो. पाणी गरम असल्याने, ते तुमच्या त्वचेवरील नैसर्गिक तेल घालवते. परिणामी तुमची त्वचा कोरडी पडते. असे न होऊ नये यासाठी अंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करावा. त्यामुळे त्वचेतील मॉइश्चर टिकून राहण्यास मदत होते. त्यासोबतच थंड हवेत जास्त वेळ अंघोळीऐवजी केवळ पाच मिनिटे पुरेशी असू शकतात.
३. एक्सफॉलिएट [exfoliate]
अंघोळीदरम्यान त्वचेवरील डेड स्किन [मृत त्वचा] काढून टाकण्यासाठी एखाद्या स्क्रबचा किंवा अंग घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्रशचा वापर करावा. शरीरावरील जे भाग सर्वांत जास्त कोरडे पडतात. उदा. हाताचे कोपरे, गुडघे, टाचा अशा भागांकडे विशेष लक्ष द्यावे; परंतु हे सर्व हलक्या हाताने करावे, जोर लावून किंवा अतिप्रमाणात अंग घासू नका.
४. क्लिंजिंग
आपले अंग व्यवस्थित ओले करून, त्यावर त्वचेची काळजी घेणारे बॉडी वॉश लावावे. मसाजप्रमाणे या बॉडी वॉशने आपले अंग स्वच्छ करून घ्यावे. ज्या ठिकाणी शरीर सर्वाधिक कोरडे पडते अशा भागांकडे लक्ष द्यावे. असे केल्याने त्वचेमधील मॉइश्चर टिकून राहण्यास मदत होते.
५. अंग कोरडे करताना…
अंघोळ झाल्यानंतर कोणताही टॉवेल घेऊन आपले अंग घासून कोरडे करू नये. त्यामुळे त्वचेला त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे अंग कोरडे करण्यासाठी एखाद्या मऊ टॉवेलचा वापर करावा. अंग घासून पुसण्याऐवजी केवळ पाणी टिपून घ्या. त्यानंतर एखाद्या मॉइश्चरायझरचा वापर करावा. मॉइश्चराजरमध्ये शे बटर [shea butter] किंवा कोको बटर हे घटक असल्यास अधिक चांगले.
हेही वाचा : डोळ्याखाली काळी वर्तुळे अन् चेहरा थकल्यासारखा दिसतोय? त्वचेची काळजी घेतील ‘हे’ पाच घरगुती फेस पॅक, पाहा
याव्यतिरिक्त पाहा दोन बोनस टिप्स
१. हायड्रेट राहणे
सगळ्यांनाच ही टीप माहीत असली तरीही त्याचे पालन फार कमी प्रमाणात केले जाते आणि ते म्हणजे भरपूर पाणी पिणे. हिवाळ्यातही पाणी पिणे गरजेचे असते. त्यामुळे शरीर आतून हायड्रेट राहण्यास मदत होते.
२. त्वचेचे संरक्षण
त्वचेवर मॉइश्चरायझर आणि क्रीम लावून आपण त्वचेची काळजी घेत असतो. परंतु, बाहेर जाताना हवा अधिक प्रमाणात गार असल्यास शरीराला थंडी लागू नये यासाठी ते व्यवस्थित झाकून घेणे आवश्यक असते. त्यासाठी तुम्ही जॅकेट, स्कार्फ, मोजे व कानटोपी यांसारख्या गोष्टींचा वापर करू शकता.