सोलो ट्रॅव्हल म्हणजेच एकट्याने प्रवास करणे हा एक अद्भुत अनुभव आहे. तसेच, हे खूप साहसी आहे. सोलो ट्रिपदरम्यान, तुम्ही केवळ तुमच्या स्वतःच्या कंपनीचा आनंद घेत नाही तर तुम्हाला नवीन लोकांना भेटण्याची संधी देखील मिळते. आयुष्यात एकदातरी एकट्याने प्रवास करायला हवा. या दरम्यान तुम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतात. सोबतच यामुळे जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत होते. आज आपण भारतातील अशी काही ठिकाणं जाणून घेणार आहोत जिथे एकट्याने प्रवास करण्याचा खूपच सुखद अनुभव तुम्हाला मिळू शकतो.

ऋषिकेश

हरिद्वारपासून जवळ असलेले ऋषिकेश हे एकट्याने प्रवासासाठी उत्तम ठिकाण आहे. तुम्ही येथे रिव्हर राफ्टिंग, बंजी जंपिंग, कॅम्पिंग आणि इतर अनेक साहसी अ‍ॅक्टिव्हिटीजचा आनंद घेऊ शकता. ऋषिकेश हे जगाची योग राजधानी म्हणूनही ओळखले जाते.

Tata Literature Live The Mumbai Litfest
बुकबातमी : इथं जाऊ की तिथं जाऊ?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
Konkan route, trains on the Konkan route,
नव्या वर्षात कोकण मार्गावरील रेल्वेगाडीला एलएचबी डबे जोडणार
nashik temperature declined to 13 degree Celsius
नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
Cloudy over South Madhya Maharashtra and South Konkan Mumbai print news
राज्यात गुरुवारपासून हलक्या सरी; जाणून घ्या, दिल्लीत दाट धुके का पडले

जयपूर

जयपूरला पिंक सिटी म्हणूनही ओळखले जाते. या शहराला समृद्ध वारसा लाभलेला असून येथे अनेक स्मारके आणि संरचना आहेत. या सर्वांशी एक आकर्षक कथा जोडलेली आहे. जर तुम्हाला इतिहासात रस असेल तर तुम्ही जयपूरला अवश्य भेट द्या. तसेच, तुम्हाला रॉयल अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही येथे एकट्याने सहलीला नक्कीच जावे.

या उन्हाळ्यात फिरायला जाण्याचा विचार करताय? भारतातील ही पाच ठिकाणं देतील सुट्टीचा सर्वोत्तम अनुभव

वाराणसी

वाराणसीला बनारस आणि काशी असेही म्हणतात. तुम्ही येथे केवळ शांतता अनुभवू शकत नाही तर अनेक स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद देखील घेऊ शकता. आनंददायी अनुभवासाठी वाराणसीला जरूर भेट द्या.

बीर बिलिंग

जर तुम्हाला पॅराग्लायडिंग करायला आवडत असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी योग्य आहे. हिमाचल प्रदेशातील हे एक छोटेसे गाव आहे. हे सर्वोत्तम पॅराग्लायडिंग साइट म्हणून ओळखले जाते. तुमच्या साहसी सोलो ट्रिपसाठी हे योग्य ठिकाण आहे.

उदयपूर

राजस्थानमधील उदयपूर हे सुंदर अरवली डोंगरांनी वेढलेले आहे. यात अनेक मोहक तलाव आहेत. भव्य वास्तुकला, सुंदर मंदिरे आणि नैसर्गिक सौंदर्य मंत्रमुग्ध करणारे आहे. तुम्ही येथे बोटिंगचा आनंद घेऊ शकता, भव्य प्राचीन किल्ले आणि बाजारपेठांमध्ये खरेदी करू शकता.

मनाली

मनाली येथे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. हे एक वंडरलँड वाटते. निसर्ग प्रेमी, साहसी प्रेमी आणि ट्रेकर्ससाठी योग्य हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्ही आइस स्केटिंग, पॅराग्लायडिंग, स्कीइंग आणि इतर अनेक साहसी अ‍ॅक्टिव्हिटीजचा आनंद घेऊ शकता.

कसोल

कसोल हे हिमाचल प्रदेशातील पार्वती नदीच्या काठावर वसलेले एक छोटेसे गाव आहे. हे खूप शांत ठिकाण आहे. आपण येथे सुंदर दृश्यांचा आनंद घेऊ शकता.