Health Tips: निरोगी राहण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती चांगली असणे अत्यंत आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-सी युक्त पदार्थ खाण्याचा सल्लाही आरोग्य तज्ञ देतात. ज्यामुळे तुम्ही अनेक आजार आणि संसर्ग टाळू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात लिंबूवर्गीय फळे, बेरी आणि भाज्यांचा समावेश करू शकता. हे पदार्थ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात, परंतु तुम्हाला माहित आहे का, व्हिटॅमिन-सी व्यतिरिक्त इतरही अनेक पोषक घटक आहेत, ज्याच्या कमतरतेमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया

व्हिटॅमिन डी
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन-डी आवश्यक आहे. हे रोगप्रतिकारक पेशी सक्रिय करण्यास मदत करते. शरीरातील या पोषक तत्वाची कमतरता भरून काढण्यासाठी काही वेळ कोवळ्या उन्हात वेळ घालवा. याशिवाय तुम्ही दूध, संत्री, दही इत्यादींचा आहारात समावेश करू शकता, ज्यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता दूर होईल.

Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…; असे का?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Wax gourd cabbage onion
कांदा,कोबी आणि कोहळा हे त्रिकुट तुम्हाला कसं निरोगी ठेवू शकतं?
Are eggs safe to eat as bird flu spreads
बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव वाढत असताना अंडी खाणे सुरक्षित आहेत का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
which food should not eat with curd
दह्याबरोबर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा आरोग्याला विपरीत परिणामांचा धोका
Leafy Vegetables Health Benefits| How much Leafy Vegetables to Eat
Leafy Vegetables Health Benefits: पालेभाज्या खाताना कोणती काळजी घ्याल?
Can eating papaya mangoes help you build muscle
पपई-आंबा खाल्ल्याने स्नायूंच्या निर्मितीसाठी मदत होऊ शकते का? तज्ज्ञांचे काय आहे मत…
Ramphal health benefits In Marathi
Ramphal : रोज रामफळ खाल्ल्याने शरीराला नेमका काय फायदा मिळू शकतो? डॉक्टरांची माहिती वाचून व्हाल खूश

व्हिटॅमिन-ए
शरीरात व्हिटॅमिन-एच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होते. ज्यामुळे तुम्ही अनेक आजार आणि संक्रमणांशी लढू शकता. या पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी, गाजर, रताळे आणि पालकसारखे पदार्थ खा. यामध्ये व्हिटॅमिन-ए पुरेशा प्रमाणात आढळते.

हेही वाचा – ‘हे’ पदार्थ कमी खाल्ल्यामुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका? कसा असावा तुमचा आहार, जाणून घ्या

झिंक
झिंक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. शरीरातील या पोषक तत्वाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, नट्स (काजू-बदाम-दाणे), बिया, संपूर्ण धान्य (Whole Grains) आणि मांस यांसारखे पदार्थ आपल्या आहाराचा भाग बनवा. ज्यामुळे शरीरातील झिंकची कमतरता दूर होते.

व्हिटॅमिन- ई
व्हिटॅमिन-ई एक अँटिऑक्सिडंट म्हणून कार्य करते, जे रोगप्रतिकारक पेशींना फ्रि रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते. तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन-ई समृद्ध पदार्थांचा समावेश केला पाहिजे. यासाठी बदाम, ब्रोकोली, एवोकाडो इत्यादी गोष्टी खाव्यात.

हेही वाचा – पोटावरील चरबी अन् कॅलरीज वाढण्यामागे फ्रुकटोज ठरतेय मुख्य कारण; बचावासाठी डॉक्टरांनी सांगितले हे उपाय

सेलेनियम
सेलेनियम हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक पोषक आहे. एंजाइम्सचे उत्पादन करण्यास मदत करते, जे ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण करते. शरीरातील या जीवनसत्त्वाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी, सेलेनियमयुक्त पदार्थ जसे नट्स, संपूर्ण धान्य Whol Grains) , अक्रोड इत्यादींचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.

Story img Loader