जगभरात स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. याआधी हा आजार ५० वर्षांवरील महिलांमध्ये दिसून येत होता, मात्र आता खराब जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे ३० वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलाही या आजाराला बळी पडत आहेत. कॅन्सरबद्दल असं म्हटलं जातं की त्याची लक्षणे लवकर ओळखली गेली तर या जीवघेण्या आजारावर उपचाराने सहज मात करता येते. परंतु जनजागृतीअभावी कॅन्सरच्या लक्षणांबाबत लोकांना माहिती नाही. यामुळे, स्तनाच्या कर्करोगाच्या ९०% प्रकरणे एडवांस स्टेजमध्ये आढळतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बर्‍याच प्रकरणांमध्ये, स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाची लक्षणे लवकर दिसू लागतात, परंतु त्यांना याची जाणीव नसते. वेळेत चाचणी न केल्यास, रोग वाढतो आणि कधीकधी मृत्यू देखील होतो. काही महिलांमध्ये कर्करोगाचा धोका खूप जास्त असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत, त्यांची दर सहा महिन्यांनी एकदा कर्करोगाची तपासणी केली पाहिजे. जाणून घेऊया कोणत्या महिलांनी कॅन्सरची चाचणी घ्यावी.

( हे ही वाचा: तुम्हालाही चालताना वेदना जाणवतायत का? असू शकतं कोलेस्टेरॉल वाढण्याचं लक्षण, इतर गंभीर लक्षणेही जाणून घ्या)

‘ही’ लक्षणे दिसल्यास तपासणी करणे आवश्यक आहे

४० वर्षांनंतर प्रत्येक वर्षी सामान्य महिलेची कर्करोगाची तपासणी केली पाहिजे. जर एखाद्या महिलेचे वय २५ पेक्षा जास्त असेल आणि तिच्या स्तनामध्ये गाठ असेल किंवा निप्पलमध्ये बदल किंवा डिस्चार्ज असेल तर त्या महिलेने त्वरित कर्करोगाची तपासणी केली पाहिजे. एक्स-रे मॅमोग्राफी, सीटी आणि पीईटी स्कॅनसारख्या चाचण्यांद्वारे स्तनातील दोष शोधले जाऊ शकतात.

‘या’ महिलांनी कॅन्सर चाचणी करावी

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जर एखाद्या महिलेला स्तनाचा कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असेल तर तो एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे जाण्याचा धोका असतो. अशा परिस्थितीत जर एखाद्या महिलेच्या कुटुंबात तिच्या आईला स्तनाचा कर्करोग झाला असेल, तर वयाची ३० वर्षे ओलांडल्यानंतर त्या महिलेने दर ६ महिन्यांनी किंवा वर्षातून एकदा कर्करोगाची चाचणी करून घ्यावी. कोणतीही लक्षणे नसली तरीही तुम्ही कर्करोगाची चाचणी करू शकता.

( हे ही वाचा: Uric Acid: यूरिक अॅसिडच्या रुग्णांसाठी चहाचे सेवन चांगले की कॉफीचे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात)

‘या’ पद्धतींनी स्तनाचा कर्करोग टाळता येतो

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ब्रेस्ट कॅन्सर टाळण्यासाठी तुमची जीवनशैली योग्य ठेवणं आणि खाण्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कॅन्सर टाळायचा असेल तर धुम्रपान करू नका आणि मद्यपान करू नका. तसेच दैनंदिन व्यायाम किंवा एरोबिक्स देखील उपयुक्त ठरतील. ज्या महिलांनी बाळाला जन्म दिला आहे त्यांनी आपल्या बाळाला स्तनपान करावे. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की स्तनपानामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: These women are most at risk of breast cancer know at what age the test should be done gps