वास्तविक, सासू-सून यांचे नात्यामध्ये नेहमी वाद, रुसवा -फुगवा असतो. पण शहाणपणाने तुम्ही या नात्यात गोडवाही निर्माण करू शकता. अनेकदा सासूबाईंबरोबर मैत्रीचे नातं तयार करण्याच्या नादात तुम्ही काही अशा गोष्टी बोलू शकता ज्यामुळे सासूबाईंचे मन दुखावले जाईल. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शब्दांची योग्य निवड.
कधी कधी आपण नकळत काही गोष्टी बोलून जातो ज्यामुळे कोणाचेही मन दुखावते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या सासू-सासऱ्यांबरोबरचे नाते सुधारायचे असेल तर या ५ गोष्टी बोलणे नक्कीच टाळा-
तुम्ही तुमच्या मुलाला काहीही शिकवले नाही –
सासूने दिलेल्या संस्कारवर टीका केल्याने तुम्ही मोठ्या अडचणीत येऊ शकता. आपल्या जोडीदारास चुकीचे सिद्ध करण्यासाठी विनोद म्हणूनही असे शब्द कधीही वापरू नका.
हेही वाचा – तुम्ही रोज दुधाचा चहा प्यायला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? तज्ज्ञांनी केला खुलासा
सासूबाई, तुम्ही तर राहूच द्या –
हे शब्द तुमच्या सासूबाईंना कधीही बोलू नका, अगदी चेष्टेनेही नाही. त्यांनी सांगितलेल्या गोष्टींना अशा पद्धतीने नकार दिल्याने तुमचे नाते बिघडू शकते. त्याचा सल्ला न स्वीकारण्याचा विनम्र मार्ग शोधा.
ही गोष्ट आता करण्याची काय गरज आहे –
सासूला ज्या पद्धतीने काम करायचे ते करू द्या. सासूच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित करू नका विशेषत: एखाद्या अपमानास्पद पद्धतीने. तुम्ही असे वागला तर तुमचे नाते बिघडू शकते.
तुमच्या लाडामुळे मुलं बिघडली आहे –
सासूबाईंना कधीही सांगू नका की त्यांच्या प्रेमामुळे तुमची मुलं बिघडली आहेत. यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.
तुम्ही माझ्या आई-वडिलांसारखेच आहात
आपल्या सासू-सासऱ्यांची तुलना आपल्या आई-वडिलांशी कधीही करू नका. विशेषतः जर तुलना नकारात्मक असेल. तिला याचं वाईट वाटू शकतं. त्यानंतर घरातील गोष्टी तुमच्यासाठी कठीण होऊ शकतात.