Immunity Boosting Foods : उन्हाळ्याच्या दिवसांत अंगदुखी, रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे, सर्दी-खोकला असे अनेक समस्या बळवतात. अशावेळी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करणे गरजेचे असते. चांगल्या रोगप्रतिकार शक्तीमुळे शरीराचे विविध संसर्ग आणि आजारांपासून संरक्षण करता येते. विशेषत: तापाच्या दिवसात आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करणे गरजेची असते. यात भारतात H3N2 व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्याची वेळ आली आहे. नियमित व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे, धूम्रपान सोडणे, निरोगी शरीर राखणे आणि अल्कोहोलचे सेवन टाळणे ही रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे मुख्य मार्ग आहेत. पण योग्य आहारासह काही पदार्थ रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात मदत करतात. हे पदार्थ कोणते जाणून घेऊ…

रोगप्रतिकारशक्ती वाढणारे ‘हे’ पदार्थ

१) आंबट फळं

आहारात आंबट फळांचा म्हणजे लिंबू, संत्री, द्राक्ष अशा पदार्थांचा समावेश करा. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.

betel leaves expensive, betel leaves,
विड्याची पाने का महागली ? जाणून घ्या, अतिवृष्टी, संततधारेचा परिणाम काय?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
Driving a scooty in the wrong way
चुकीच्या पद्धतीने स्कुटी चालवल्याने उद्भवतील अनेक समस्या; ‘या’ टिप्स करतील मदत
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
simple tips the car will look like new even in rainy season
‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने पावसाळ्यातही कार दिसेल नव्यासारखी
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?
Pune, respiratory disorders, humidity, asthma, allergies, fungal growth, health experts, Sassoon Hospital, health news
पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे आजारांना निमंत्रण! जाणून घ्या कशी घ्यावी काळजी…

२) बदाम

बदाम खाल्ल्यानेही रोगप्रतिकार शक्ती वाढते, कारण त्यात मोठ्याप्रमाणात पोषक तत्वे असतात. याशिवाय बदाम हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. बदाम हे व्हिटॅमिन ई, झिंक, मॅग्नेशियम आणि प्रथिने यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांचा एक मोठा स्त्रोत आहे ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीच्या कार्यास चालना मिळते.

३) हळद

हळद हा एक सर्वात उपयोगी मसाला आहे, जो आपल्या आहारात अनेक प्रकारे वापरला जाऊ शकतो. हळदीमध्ये कर्क्युमिन हा गुणधर्म असून जो रोगप्रतिकारक कार्यास चालना देतो. तुम्ही रोज हळद घालून दूध पिऊ शकता किंवा रोजच्या जेवणात मसाल्यांमध्येही हळदीचा वापर करू शकता.

४) ग्रीन टी

ग्रीन टी केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही वापरली जाते. ग्रीन टीचे इतरही अनेक फायदे आहेत. ग्रीन टीमध्ये एपिगॅलोकाटेचिन गॅलेट असते, जे रोगाशी लढणारे अँटिऑक्सिडेंट तयार करते. यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.

५) ताक

ताक हे कॅल्शियम युक्त एक देशी पेय आहे. शरीरास ताजेतवाने ठेवणारे हे पेय उन्हाळ्यात खूप फायदेशीर मानले जाते ताकामध्ये असलेले लैक्टिक ऍसिड रोगप्रतिकारक प्रणालीच्या सुरळीत कार्यास मदत करते. तुम्ही ताक किंवा छासमध्ये सेंधव मीठ, मिरपूड, पुदिन्याची पाने आणि इतर मसाले घालू उन्हाळ्यात पिऊ शकता. ज्यातून तुम्हाला स्वादिष्ट भारतीय पेय प्यायल्याचा आनंद होईल.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे इतरही अनेक पदार्थ आहेत, जसे की, लसूण, आले, किवी, पपई, ब्रोकोली, पालक, दही, भोपळी मिरची आणि बिया आणि काजू.