आजकाल डिजिटल मीडिया आणि इंटरनेटमुळे आपले जीवन खूप सोपे झाले आहे. खाण्यापिण्यापासून ते कपड्यांच्या खरेदीपर्यंत लोक ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देत आहेत. सोशल मीडिया आणि डेटिंग अ‍ॅप्सच्या माध्यमातून लोक जोडीदार निवडण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. कोरोनाच्या काळात डिजिटल मीडिया आणि इंटरनेटवरील लोकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्सची मागणीही गेल्या २ ते ३ वर्षांत आणखी वाढली आहे.

तरुण पिढीमध्ये ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्सची लोकप्रियता वाढली आहे त्याचप्रमाणे अनेकांना ऑनलाईन डेटिंग स्कॅमचाही सामना करावा लागत आहे. आज आपण जाऊन घेऊया की ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्सद्वारे होणार्‍या फसवणुकीपासून आपण स्‍वत:चे संरक्षण कसे करू शकतो.

रशियन सैन्याशी लढायला जाण्यासाठी मद्यधुंद अवस्थेत महिला निघाली युक्रेनला; बुक केलेल्या टॅक्सीचे भाडे ऐकून थक्क व्हाल

ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्समध्ये फसवणूक टाळण्यासाठी काही खास टिप्स :

प्रोफाइल तयार करताना काळजी घ्या :

कोणत्याही डेटिंग अ‍ॅप्सवर प्रोफाइल तयार करताना, तुमच्या वैयक्तिक गोष्टी कोणाशीही शेअर करू नका. विशेषतः ईमेल आयडी, सोशल मीडिया आयडी, फोन नंबर इ. शेअर करू नका.

फोटो शेअर करणे टाळा :

सोशल मीडिया किंवा डेटिंग अ‍ॅप्सवर फोटो शेअर करताना सुरक्षिततेची काळजी घ्या. ते कधीही सार्वजनिक ठिकाणी शेअर करू नका. असे केल्याने कोणीही तुमचे फोटो डाउनलोड करून चुकीच्या पद्धतीने वापरू शकतो. आपल्या फोटोच्या बाबतीत गोपनीयता पाळा.

जोडीदार शोधण्याची घाई करू नका :

ऑनलाइन डेटिंग अ‍ॅप्सवर जोडीदार शोधण्याची घाई करू नका. अश्लील व्हिडीओ कॉल्स टाळा. तुमचा वैयक्तिक आयडी, घराचा पत्ता, बँक खाते तपशील इत्यादी शेअर करण्याची घाई करू नका. यामुळे तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता.

पुतिन यांच्या त्या एका निर्णयामुळे तरुणीच्या अश्रूंचा बांध फुटला; धाय मोकलून रडतानाचा व्हिडीओ व्हायरल

नाही म्हणायला शिका :

डेटिंग अ‍ॅप्सवर कोणाचा संशय आल्यास स्पष्टपणे नाही बोलण्यास शिका आणि नाही बोलल्यानंतरही जर तुम्हाला वारंवार मेसेज आणि कॉल येत असतील तर सायबर सेलकडे तक्रार करा.

डेटिंग करण्यापूर्वी काळजी घ्या :

जर तुम्ही पहिल्यांदाच एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटणार असाल, तर भेटण्यासाठी गर्दी असेल अशी जागा निवडा किंवा तुमच्या मित्राला किंवा नातेवाईकाला सोबत घेऊन जा जेणेकरून कोणतीही अनुचित घटना टाळता येईल. अनोळखी व्यक्तीसोबत काहीही खाण्याआधी लक्षात ठेवा की त्यामध्ये कोणतेही मादक पदार्थ टाकलेले तर नाहीत ना.

आजकाल डेटिंग अ‍ॅप्सच्या माध्यमातून अनेक फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. अशा परिस्थितीत डेटिंग अ‍ॅप्सद्वारे जोडीदार शोधताना काळजी घ्या.

Story img Loader