Two eggs for breakfast daily: अंडी खाणे हा बहुतेक लोकांचा आवडता नाश्ता असतो. आरोग्यतज्ज्ञ न्याहारीमध्ये अंडी खाण्याचा सल्ला देतात, तसेच फिटनेस फ्रेकदेखील प्रोटीन्स मिळविण्यासाठी अंड्यांचा आहारात समावेश करतात. एकूणच अंडी खाण्याचे अनेक फायदे आहेत. अंडी स्नायूंच्या विकासाबरोबरच शरीराला रोगांपासून वाचवण्यासाठीही उपयुक्त ठरतात. पण तुम्हाला माहितीये का, दररोज दोन अंडी खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो? अनेकांचा असा विश्वास आहे की, नाश्त्याला दोन अंडी शरीराची प्रथिनांची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहेत, मात्र हे खरे नाही. पोषणतज्ज्ञ जस्मिन गर्गने इन्स्टाग्रामवर शेअर केले की, नाश्त्यासाठी दोन अंडी खाल्ल्याने चरबी कमी होते आणि स्नायूंची ताकद वाढते. “तुमचे ध्येय चरबी कमी करणे आणि स्नायू वाढवणे हे असेल तर तुम्हाला सकाळी किमान २५-३० ग्रॅम प्रथिने आवश्यक आहेत, त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर रोज दोन अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो.
अंडी खाण्याचे फायदे
संशोधकांनी असेही सांगितले की, अंडी केवळ मेंदूसाठीच फायदेशीर नसतात, तर महिलांच्या हाडांच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीर ठरू शकतात.
- अंडी खाल्ल्याने दृष्टी चांगली राहते.
- वजन नियंत्रित ठेवण्यासाठी अंड्याचा पांढरा भाग खावा.
- अंडी खाल्ल्याने शरीराला पुरेशी प्रथिने मिळतात.
- अंडी खाल्ल्याने पोट भरलेले राहते, त्यामुळे अस्वास्थ्यकर अन्न टाळले जाते.
- कोणताही उपाय करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
अहमदाबाद येथील झायडस हॉस्पिटल्सचे मुख्य क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट श्रुती के. भारद्वाज यांनी स्पष्ट केले की, दोन अंडी सुमारे १२-१४ ग्रॅम प्रथिने प्रदान करतात. “लठ्ठपणा कमी करण्याच्या प्रवासात चरबी कमी करण्यासाठी, भूक नियंत्रित करण्यासाठी, ऊर्जा राखण्यासाठी आणि स्नायूंच्या संरक्षणास समर्थन देण्यासाठी अंड्यांचं सेवन उपयोगी ठरू शकतं.
प्रथिनांची गरज का आहे?
- प्रथिने पचण्यासाठी अधिक ऊर्जा घेतात , ज्यामुळे तुमचा चयापचय दर वाढण्यास मदत होते.
- उच्च प्रथिनांचा नाश्ता तुम्हाला जास्त काळ पोटभर ठेवतो आणि दिवसभर खाण्याची लालसा कमी करतो
- तसेच, प्रथिने रक्तातील साखरेची योग्य पातळी राखण्यास मदत करतात.
क्षुधातृप्तीचे घटक : अंड्यांमधील प्रथिने भुकेच्या तृप्तीसाठी पुरेशी असतात; परंतु संतुलित आहाराच्या दृष्टीने फायबर आणि निरोगी चरबीही आवश्यक असते. “आहारात भाज्या, संपूर्ण धान्याचा टोस्ट किंवा अॅव्होकॅडोचा समावेश केल्याने चयापचय क्षमता वाढते आणि जास्त काळ पोट भरलेले राहते.
स्नायुबल टिकवून ठेवण्याची गरज : चरबी कमी होत असताना स्नायूंचे बल टिकवून ठेवण्यासाठी प्रथिने महत्त्वपूर्ण असतात. “तुमच्या शरीराच्या वजनानुसार, तुम्हाला प्रत्येक जेवणामधून २०-३० ग्रॅम प्रथिनांची आवश्यकता असू शकते. फक्त दोन अंडी ही गरज पूर्ण करत नाहीत.