वजन कमी करण्यासाठी टिप्स

भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या पनीरमध्ये ड जीवनसत्त्व, प्रथिने व कॅल्शियम हे भरपूर प्रमाणात असते. हे एक प्रकारचे चीज असून, त्याच्यातील पोषक घटक आणि त्याच्या चवीमुळे पनीर देशभरात भरपूर प्रमाणात वापरला जाणारा दुग्धजन्य पदार्थ आहे. पनीरचा वापर भाज्या, चटपटीत पदार्थांमध्ये केला जातो. पनीर बनवण्यासाठी केवळ दोन पदार्थांची आवश्यकता असते आणि ते म्हणजे दूध व लिंबाचा रस. पनीरमध्ये मुळातच फॅट्स आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने आपल्या आहारात पनीरचा समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामधून शरीराला पोटॅशियम व सेलेनियम यांसारखे घटकही मिळतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वजन कमी करण्यास पनीर कसे उपयुक्त?

पनीर वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते हे सगळ्यांनाच माहीत आहे. पनीरमध्ये कार्बोदकाचे प्रमाण कमी व प्रथिनांचे प्रमाण जास्त असल्याने, वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये याचा समावेश केला जातो. त्याचप्रमाणे पनीरचे सेवन केल्याने मेटॅबॉलिझम सुधारते आणि स्नायूंनाही त्याची मदत होते. खरे तर मांसाहारात भरपूर प्रमाणात प्रथिने असतात; परंतु शाकाहारींसाठी पनीर हा सर्वोत्तम पर्याय आहे.

हेही वाचा : कितीही झोपलात तरी ती पाच मिनिटांची झोप सोडवत नाही ना? मग संशोधन काय सांगतेय ते एकदा पाहा

पनीर खाऊन वजन कमी करण्याच्या पाच टिप्स

१. पनीरमध्ये लोह, प्रथिने, कॅल्शियम यांसारखे घटक भरपूर प्रमाणात असतात; ज्यामुळे स्नायू बळकट होण्यास मदत होते. याबाबत केल्या गेलेल्या अभ्यासातून असे दिसून आले की, पनीरचे सेवन केल्यानंतर व्यक्तीला बराच वेळ भूक लागत नाही. परिणामी ती व्यक्ती शरीराला गरज आहे तेवढ्याच प्रमाणात कॅलरीज घेते.

२. पनीरमध्ये फॅट्स आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असल्याने वजन कमी होण्यास हे घटक उपयोगी ठरतात. त्यासोबतच कर्बोदकांच्या कमी प्रमाणामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते; ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

३. घ्रेलिन हार्मोन (Ghrelin Harmone) हा आपली भूक आणि वजन वाढवण्याचे काम करतो. या हार्मोनला नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.

४. पनीरमध्ये असलेल्या चांगल्या फॅट्समुळे शरीरात ऊर्जा म्हणून साठवून ठेवलेली अनावश्यक चरबी जाळण्यास मदत होऊन वजन कमी होते.

५. पनीरमध्ये असलेल्या प्रो-बायोटिक्समुळे पोटाच्या समस्या दूर होतात; ज्यामुळे पचनास मदत होते. म्हणजेच पोटाची निगा राखून वजनही कमी करण्यासाठी पनीरची मदत होते.