Home Remedies: जसजसे वय वाढू लागते चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणेही दिसू लागतात. जरी, ही एक नैसर्गिक क्रिया असली तरी ती थांबवता येत नाही. परंतु, काही घरगुती उपाय आहेत ज्याने ह्या सुरकुत्या आणि बारीक रेषा हलक्या कमी होऊ शकतात. खरं तर त्वचेची योग्य वेळी काळजी घेण्यास सुरुवात केली तर त्वचा वर्षानुवर्षे तरूण आणि चमकदार राहते. परंतु, वेळीच त्वचेची काळजी न घेतल्याने सुरकुत्या लवकर चेहऱ्यावर दिसतात. तर यासाठी कच्चे दूध चेहऱ्यासाठी वापरणे फायदेशीर ठरेल. कच्च दूध स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होऊ शकते ज्याचा वापर सुरकुत्या कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो. हे केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठी देखील आश्चर्यकारक असल्याचे सिद्ध झाले आहे.
सुरकुत्यांसाठी कच्चे दूध
दुधात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, प्रोटीन, बायोटिन, पोटॅशियम आणि कॅल्शियम आढळते. उकळलेले दूध आणि कच्चे दूध यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक आहे. कच्चे दूध हे अनपेश्चराइज्ड असते आणि त्यात वरील गुणधर्मही भरपूर असतात, त्यामुळे ते आरोग्यासाठी तर चांगले असतेच पण त्वचेसाठी अनेक पटींनी चांगले असते. विशेषत: सुरकुत्या कमी करण्यासाठी महागड्या उत्पादनांऐवजी तुम्ही हे साधे कच्चे दूध तुमच्या त्वचेच्या काळजीचा एक भाग बनवू शकता.
तुम्ही दररोज कच्च दूध चेहऱ्यावर लावल्यास त्यामध्ये असलेले पोषक सुरकुत्या आणि चेहऱ्यावरील रेषा हलक्या करण्यास मदत करू शकतात. याशिवाय तुम्ही कच्च्या दुधाचा मास्कही तयार करू शकता. यासाठी कच्च्या दुधात केळी आणि अननस मिसळा आणि नंतर त्यात जवसाचे तेल टाका. आता हा मास्क सुमारे अर्धा तास चेहऱ्यावर ठेवल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. या मास्कशिवाय कच्च्या दुधात पपईचा लगदा, व्हिटॅमिन ई कॅप्सूल, मध आणि लिंबाचा रस मिसळून २० ते २५ मिनिटे लावता येऊ शकतात. आठवड्यातून एकदा फेस मास्क लावणे त्वचेसाठी चांगले असते.
हे देखील आहेत फायदे
१) कच्च्या दुधामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात, तसंच ते चेहऱ्यासाठी चांगले क्लिन्जर असल्याचे देखील सिद्ध झाले आहे. चेहर्यावरील घाण काढण्यासाठी हे रोज लावता येते.
२) त्याचप्रमाणे कच्च्या दुधात २ चमचे ओट्स आणि एक चमचा मध मिसळून चेहऱ्यावर स्क्रब म्हणून देखील वापरता येतो. हे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते.
३) केळ्यासोबत कच्चे दूध लावल्याने चेहरा मॉइश्चराइज होतो.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)