उन्हाळ्याच्या दिवसात थंड वाटावे म्हणून अनेक जण कोल्ड ड्रिंक पितात. कोल्ड ड्रिंक जास्त प्रमाणात प्यायल्यास अनेक आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे आरोग्यतज्ज्ञांकडून कोल्ड ड्रिंक न पिण्याचा सल्ला दिला जातो. अशा वेळी फ्रीजमध्ये ठेवलेली कोल्ड ड्रिंकची बाटली आपण रोज थोडी थोडी करून संपवतो. पण वारंवार ती बाटली तुम्ही ओपन करत असेल तर त्यातील कोल्ड ड्रिंकला चव लागत नाही, त्यामुळे ते कोल्ड ड्रिंकनंतर आपण फेकून देतो. पिण्यायोग्य न राहिलेले हे कोल्ड ड्रिंक आपण घरातील इतर कामांसाठी वापरू शकतो, पण ते कसे वापरायचे जाणून घ्या.
गाडीची विंडशील्ड करा स्वच्छ
गाडी चालवताना रस्ता स्पष्ट दिसावा यासाठी गाडीची विंडशील्ड स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी तुम्ही खराब कोल्ड ड्रिंकचा वापर करू शकता. विंडशील्डवर कोल्ड ड्रिंक लावा. दोन ते तीन मिनिटे असेच ठेवल्यानंतर ओल्या कपड्याने स्वच्छ करा. कोल्ड ड्रिंकने विंडशील्ड आणि बम्परवरील धूळसहजपणे काढता येते.
डार्क रंगाच्या कपड्यांवरील तेलाचे डाग काढा
पांढऱ्या कपड्यांवरील डाग काढणे खूप सोपे आहे, परंतु डार्क रंगाच्या कपड्यांवर डाग पडल्यास ते काढणे खूप कठीण होते. अशा वेळी तुम्ही कोल्ड ड्रिंकची मद त घेऊ शकता. कोल्ड ड्रिंकने कपड्यांवरील तेल किंवा ग्रीसचे डाग सहज काढता येतात.
तुम्ही वॉशिंग मशीनमध्ये डिटर्जंट आणि कोल्ड ड्रिंक टाकून डाग लागलेले कपडे स्वच्छ करू शकता. किंवा कोल्ड ड्रिंकने डाग लागलेल्या भागावर लावून ३० मिनिटांनी धुऊ शकता.
टॉयलेट सीट करा चमकदार
टॉयलेट सीट पॉलिश करण्यासाठी बरेच लोक महागडे क्लीनर वापरतात. अशा परिस्थितीत फ्रीजमध्ये ठेवलेले उरलेले कोल्ड ड्रिंक तुमचे पैसे वाचवू शकतात. यासाठी खराब कोल्ड ड्रिंक एका स्प्रेच्या बाटलीत भरून टॉयलेट सीटवर स्प्रे करा, यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी ते ब्रशने स्क्रब करा आणि फ्लश करा. यामुळे तुमची टॉयलेट सीट नव्यासारखी चमकेल.
लोखंडी वस्तूंवरील गंज काढा
ओलाव्यामुळे लोखंडी वस्तू गंजतात. त्यामुळे त्या खूप खराब दिसतात. अशा परिस्थितीत जर तुमच्या घरात ठेवलेल्या लोखंडी वस्तूंना गंज लागला असेल तर तुम्ही कोल्ड ड्रिंकच्या मदतीने ते स्वच्छ करू शकता. कोल्ड ड्रिंकच्या मदतीने तुम्ही कारमधील गंजदेखील काढू शकता.
ॲल्युमिनियम फॉइलचा एक छोटा तुकडा घ्या. तो फोल्ड करून कोल्ड ड्रिंकमध्ये भिजवा आणि गंजलेल्या भागावर डाग जाईपर्यंत चोळा. जर लहान वस्तू गंजलेली असेल तर ती कोल्ड ड्रिंकमध्ये भिजवून ठेवू शकता.
फरशी आणि टाइल्स करा स्वच्छ
काही वेळा सिमेंटच्या फरशीवर किंवा टाइल्सवर तेल किंवा ग्रीस सांडल्याने डाग पडतात, जे मॉपिंगने सहज निघत नाहीत. अशा वेळी ते स्वच्छ करण्यासाठी त्यावर कोल्ड ड्रिंक लावा आणि नंतर स्वच्छ कापडाने पुसून टाका. काही मिनिटांत संपूर्ण डाग निघून जातील. फरशी किंवा टाइल्सवरील कोणतेही डाग काढून टाकण्यासाठी तुम्ही ही ट्रिक वापरू शकता.