आज व्हॅलेंटाइन डे, म्हणजेच आपल्या प्रिय व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करण्याचा खास दिवस. आपल्यातील अनेकजणांनी आपल्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्यासाठी काही खास प्लॅन्स केले असतील. साधारणतः चांगला वेळ घालवण्यासाठी एखाद्या विशिष्ट दिवसाचीच आवश्यकता असते असा अनेकांचा समज आहे. परंतु गोष्ट प्रेमाची असेल तर हा समज चुकीचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खरंतर फेब्रुवारी महिना सुरु झाला की प्रेमाचे वारे वाहू लागतात. परंतु व्हॅलेंटाइन डे हा दिवस फक्त प्रेमी जोडप्यांपर्यंतच सीमित ठेवण्यात आला आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांना त्यांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे प्रेम या भावनेचा अनुभव घेता आला नाही. त्यामुळेच व्हॅलेंटाईन डे जवळ येताच ते अस्वस्थ आणि निराश होतात. परंतु हा एक नकारात्मक विचार आहे. या विचारांमुळेच आपण स्वतःमध्ये असलेल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी वेळ काढत नाही आणि स्वतःबद्दलचे प्रेम आणि स्वत: ची काळजी याकडे दुर्लक्ष करू लागतो.

Video : दुर्मिळ आजाराशी लढा देत, वयाच्या १४व्या वर्षी समुद्रावर राज्य करणारी भारताची जलपरी; गोष्ट अ’सामान्यांची – भाग १६

अशा परिस्थितीत, आज आपण जाणून घेऊया, यंदाच्या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आपण स्वतःवर कसे प्रेम करू शकतो आणि आपल्या आयुष्यात सेल्फ केअर, तसेच सेल्फ लव्हचा समावेश कसा करू शकतो.

यंदाच्या व्हॅलेंटाइनला असे करा स्वतःवर प्रेम

स्वतःमधील चांगल्या गोष्टींची लिस्ट तयार करा

अशी अनेक माणसे आपण आपल्या आजूबाजूला पाहतो, ज्यांना आपण परिपूर्ण मानतो. अशात आपण त्यांच्याशी स्वतःची तुलना करतो आणि आपल्यातील आत्मविश्वास गमावतो. पण प्रत्येकजण असाच विचार करतो त्यामुळे कोणीच परिपूर्ण नसतो. म्हणूनच तुम्ही स्वतःमधील चांगल्या गोष्टी समजून घेऊन त्यांची लिस्ट तयार करा. तुमचा आत्मविश्वास आणि स्वतःबद्दलचे प्रेम वाढवण्याचा हा एक उत्तम मार्ग असू शकतो.

रेल्वे रुळांमध्ये दगड का टाकले जातात माहित आहे का? जाणून घ्या यामागची रंजक कारणे

स्वतःला खास भेट देणे

इतरांशिवाय तुम्ही तुमचा आनंद किंवा यश साजरे करू शकत नाही, ही गोष्ट मनातून काढून टाका. जर तुमच्याजवळ कोणीही नसेल तर अशावेळी निराश होण्यापेक्षा तुम्ही स्वतःला मेजवानी किंवा एखादी खास भेट द्या. जेव्हाही तुम्ही एखादे काम साध्य कराल तेव्हा त्या रात्री रात्रीच्या जेवणाला चांगल्या ठिकाणी जा किंवा तुमच्या आवडत्या वस्तू खरेदी करा.

नाचा आणि गाणी गा

जर कोरोना महामारीमुळे तुम्ही बाहेर पार्टी करू शकत नसाल किंवा मित्रांसोबत फिरू शकत नसाल, तर तुम्ही घरी स्वत:सोबत दर्जेदार वेळ घालवू शकता. यासाठी तुम्ही लेटेस्ट गाणी किंवा तुमची आवडती गाणी ऐका आणि त्यावर डान्स करा. तुम्हाला नक्कीच बरे वाटेल.