थंडीच्या दिवसात लोक स्वतःला उबदार वातावरणात ठेवण्यासाठी आणि थंडीपासून बचावासाठी अनेक उपाय करतात. ग्रामीण भागात लोक हिवाळा टाळण्यासाठी शेकोटी पेटवून व्यवस्था करतात, तर शहरी भागात रूम हिटर किंवा ब्लोअर वापरतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्हाला रूम हीटरचे तोटे माहित आहेत का?
जरी लोकांना रूम हीटर्स खूप आवडत असले तरीही बहुतेक लोकांना यामुळे होणारे नुकसान माहित नाही. बहुतेक रूम हीटर्समध्ये लाल-गरम धातूचा रॉड असतो, जो हवेतील आर्द्रता शोषून घेतो आणि त्यामुळे खोलीचं तापमान वाढतं. यामध्ये खोलीत ऑक्सिजनची कमतरता आणि त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

मुलांच्या समस्या
रुम हिटरचा वापर केवळ वृद्धांसाठीच नाही तर लहान मुलांसाठीही फायदेशीर मानला जातो. असं मानलं जातं की रूम हीटर्सचा दीर्घकाळ वापर केल्याने केवळ मुलांच्या त्वचेलाच नव्हे तर नाकाच्या पोकळ्यांना देखील नुकसान होतं. त्यामुळे लहान मुलांच्या त्वचेवर पुरळ उठून नाक वाहायला लागतं.

आणखी वाचा : बेडशीट किती दिवसात बदलावे? यामागचे कारण बहुतेकांना माहीत नाही, जाणून घ्या…

ऑक्सिजनची कमतरता
हीटर कधीही बंद खोलीत वापरू नये, असा सल्ला तज्ज्ञ नेहमी देतात. त्यामुळे हवेतील ऑक्सिजनचा वेगाने वापर सुरू होतो आणि त्यामुळे खोलीत ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते. ऑक्सिनच्या कमतरतेमुळे लोकांना गुदमरणे, मळमळ आणि डोकेदुखीचा त्रास होऊ लागतो. मात्र, जर तुम्हाला रूम हीटर वापरायचा असेल, तर तुमच्या खोलीत वेंटिलेशनची विशेष काळजी घ्या.

आणखी वाचा : Health Tips : रात्री झोपण्यापूर्वी गरम पाणी प्या, या आरोग्य समस्यांचा धोका कमी होईल

विषारी वायूचा मेंदूवर गंभीर परिणाम होतो
हीटर कार्बन मोनॉक्साईडसारखा विषारी वायूही घरात सोडतो. असं मानलं जातं की या वायूचा लहान मुलांच्या मेंदूवर वाईट परिणाम होतो. तासनतास खोलीत हीटर चालू ठेवल्याने या विषारी वायूचा मुलांच्या आरोग्यावरच नाही तर मोठ्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. दम्याच्या रुग्णांना हीटर असलेल्या खोलीत न बसण्याचा सल्ला दिला जातो.

आणखी वाचा : Tips For Long Hair: लांब सडक आणि दाट केस हवेत? , मग या टिप्स नक्की फॉलो करा!

हीटरमुळे त्वचेचेही नुकसान होते
खोलीत हीटर चालवल्याने तुमच्या त्वचेला विशेष नुकसान होऊ शकते. वास्तविक, हीटर असलेल्या खोलीत जास्त वेळ बसल्याने त्वचेतील ओलावा कमी होतो आणि त्यामुळे खाज सुटणे किंवा ऍलर्जी देखील होते. कधीकधी त्वचेवर काळवटपणाही येतो. अशा परिस्थितीत खोलीत थोडा वेळ हीटर चालवा आणि नंतर खोली गरम झाल्यावर तो बंद करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Those who use room heater in winter be careful knowing the damage will repent prp