अनेक कारणांसाठी आपण दवाखान्यात जातो. यावेळी डॉक्टरांनी लिहून दिलेले प्रिस्क्रीप्शन समजणे अनेकदा कठीण जाते. डॉक्टरांनी लिहिले हे प्रिस्क्रीप्शन केवळ मेडिकल दुकानदारालाच समजते. त्यामुळे मेडिकल दुकानदारालाचं डॉक्टरांची लिहिलेली औषधं कधी आणि कशी घ्यायची हे विचारावे लागले. हा अनुभव तुमच्या- आमच्यापैकी अनेकांना आला असेल. पण तुम्हाला माहित आहे का, डॉक्टरांनी खराब हस्ताक्षरात लिहिलेल्या प्रिस्क्रीप्शनमुळे जगभरात हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. यासंदर्भात आत्तापर्यंत अनेक अहवाल समोर आले आहेत.
नॅशनल अॅकॅडमी ऑफ सायन्स इन्स्टिट्यूटच्या २००६ च्या आकडेवारीनुसार, डॉक्टरांच्या चुकीच्या हस्ताक्षरामुळे दरवर्षी सुमारे ७ हजार लोकांचा मृत्यू होतो. तर जॉन हॉपकिन्सच्या २०१८ च्या अहवालानुसार, केवळ अमेरिकेमध्ये वैद्यकीय चुकांमुळे अडीच लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतोय.
इतर अनेक अभ्यासांमध्ये ही आकडेवारी जास्त आहे. या अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अमेरिकेत दरवर्षी मेडिकल स्क्रीप्टमधील चुका आणि वैद्यकीय चुकांमुळे सुमारे ४.५ लाख लोकांचा मृत्यू होतो. हा आकडा ५ वर्षांपूर्वीचा आहे. त्यामुळे आता या आकडेवारीत बदल होऊ शकतो. जगातल्या प्रत्येक देशात डॉक्टरांच्या खराब अक्षरामुळे रुग्णाची प्रकृती गंभीर होत असल्याच्या किंवा त्याचा मृत्यू झाल्याच्या बातम्या सर्रास येत असतात. याच गोष्टीची दखल घेत भारतातील ओडिसा उच्च न्यायालयाने डॉक्टरांना समजेल अशा अक्षरात लिहिण्याचा सल्ला दिला आहे.
टाइम मॅगझिनने २०१८ च्या अहवालात म्हटले की, डॉक्टरांच्या खराब आणि घाणेरड्या हस्ताक्षरामुळे एका वर्षात ७००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. नॅशनल अकॅडमी ऑफ सायन्स इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनने (IOM)म्हटले की, डॉक्टरांनी खराब अक्षरात लिहून दिलेले प्रिस्क्रिप्शन अनेकदा रुग्णांना समजत नाही, यामुळे १.५ लाखांहून अधिक लोक आजारी पडतात. अहवालात त्यांनी असेही म्हटले की, अमेरिकेत दरवर्षी ३२ कोटी मेडिकल स्क्रिप्ट समजत नाही त्यामुळे अडचणी वाढत आहेत.
पण माणसाच्या मृत्यूमागे इतरही अनेक कारणे आहेत. काही वेळा साहसही मृत्यूचे कारण ठरत आहे. माउंट एव्हरेस्टवर चढताना २०० हून अधिक मृतदेह आपल्याला दिसतात. जे साहस करतानाच झालेले मृत्यू आहेत. माउंट एव्हरेस्टच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना या मृतदेहांमुळे रस्ता समजतो.
टाईम मॅगझिननुसार, अमेरिकेत दरवर्षी ६०० लोक बेडवरून पडून मरण पावतात. ही गोष्ट थोडी असामान्य वाटते पण हे खरं आहे. याचे कारण म्हणजे बहुतांश लोक एकटे राहतात, किंवा नशेच्या अवस्थेत झोपतात अशावेळी बेडवरून पडून मृत्यू होत आहे. एका आकडेवारीनुसार, विमान अपघातापेक्षा विमानतळावर जाताना कार अपघातात मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते.
अनेक अभ्यासातून असे दिसून आले की, व्यायामाचा अभाव हे जगातील सर्वाधिक मृत्यूचे एक कारण आहे. जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज आहे की, जगातील प्रत्येक ८ लोकांपैकी १ व्यक्तीचा मृत्यू प्रदुषणासंबंधीत कारणांमुळे मृत्यू होत आहे.
सध्या जगभरातील मृत्यूची सर्वात मोठी कारणे म्हणजे कर्करोग, हृदयविकार आणि रस्ते अपघात. पण एखाद्या व्यक्तीचा मृत्यू केव्हा झाला आणि कधी झाले हे वैद्यकीय तज्ज्ञचं शोधू शकतात.