प्रौढांमध्ये आढळणाऱ्या किंवा वैद्यकीय परिभाषेत ‘टाइप २’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मधुमेहाचे शास्त्रज्ञांनी तीन उपप्रकार शोधून काढले आहेत. त्यांच्या आधारावर अधिक परिणामकारक आणि नेमके उपचार करता येतील, असा आशावाद शास्त्रज्ञांच्या या गटाचे प्रमुख जोएल डडली यांनी व्यक्त केला आहे.
माऊंट सिनाई येथील इकान स्कूल ऑफ मेडिसिन या संस्थेतील शास्त्रज्ञांनी या विषयावर संशोधन केले. त्याचे निष्कर्ष सायन्स ट्रान्स्लेशनल मेडिसिन नावाच्या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाले. या शास्त्रज्ञांनी ‘टाइप २’ मधुमेहाच्या ११,००० रुग्णांच्या माहितीचे विश्लेषण केले. त्यात अन्य माहितीबरोबरच रुग्णांच्या जनुकीय रचनेबाबतही माहिती होती.
अभ्यासात असे दिसून आले की मधुमेहाचा परिणाम या रुग्णांवर वेगवेगळ्या प्रकारे होत होता. पहिल्या प्रकारात रुग्णांना मूत्रपिंड आणि डोळ्यांवर परिणाम झाला होता. दुसऱ्या प्रकारात चेतासंस्थेचे विकार आणि विविध प्रकारच्या अ‍ॅलर्जी झाल्या होत्या. तर तिसऱ्या प्रकारात रुग्णांना एचआयव्हीची बाधा अधिक प्रमाणात झाली होती. या तिन्ही प्रकारच्या रुग्णांमधील जनुकीय रचनाही विशिष्ट प्रकारची होती. त्यानुसार आता टाइप-२ मधुमेहाचे तीन उपप्रकार पाडण्यात आले आहेत.
या संशोधनाचा वापर करून मधुमेहावर अधिक अचूक व परिणामकारच उपाय करता येतील. नव्या औषधांची रचना करता येईल, असे या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मधुमेहाचे सामान्यपणे ‘टाइप-१’ आणि ‘टाइप-२’ असे प्रकार पडतात. ‘टाइप-१’ हा प्रकार शक्यतो लहान मुलांमध्ये आढळतो आणि त्याचे प्रमाण कमी आहे. तर ‘टाइप- २’ हा प्रकार प्रौढांमध्ये आढळतो आणि तो जास्त सामान्य आहे. म्हणजेच मधुमेहाच्या एकूण रुग्णांपैकी साधारण ९० टक्के रुग्ण ‘टाइप-२’ प्रकारचे असतात. दोन्ही प्रकारच्या मधुमेहांत अन्यही काही फरक आहेत. टाइप-२ मधुमेहाच्या रुग्णांमध्ये रक्तातील शर्करतेचे प्रमाण अधिक असते आणि त्याला नियंत्रित करणारे इन्शुलिन स्वादुपिंडामध्ये नियमितपणे स्रवत नसते. तर टाइप-१ प्रकारात स्वादुपिंडातील आयलेट्स ऑफ लँगरहॅन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेशी बाधित झाल्याने इन्शुलिनची पूर्ण कमतरता असते.