आयुष्यातील छोट्या गोष्टी आपल्या मोठी भूमिका बजावतात. जसं की आपल्या शरीरातील थायरॉईड ग्रंथी. हे फुलपाखराच्या आकाराचे अवयव आहे, जे ठराविक प्रमाणात थायरॉईड हार्मोन तयार करते. हे हार्मोन अनेक शारीरिक कार्ये नियंत्रित करतो. यामधील असंतुलनामुळे आपल्या शरीरात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. या हार्मोनच्या अतिउत्पादनामुळे हायपरथायरॉईडीझम होतो. आयुर्वेदाच्या डॉक्टर दीक्षा भावसार यांनी सोशल मीडियाद्वारे लोकांना थायरॉईड असंतुलनाची काही महत्त्वाची कारणे आणि लक्षणे सांगितली आहेत.

तर यावेळी डॉ दीक्षा यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत थायरॉईड हा तुमच्या अंतःस्रावी प्रणालीचा आत्मा आहे.अनेकदा त्याच्या असंतुलनाकडे दुर्लक्ष करतो, ज्यामुळे थायरॉईडमधील असंतुलन गंभीर पातळीवर पोहोचते म्हणून या लक्षणांकडे लक्ष द्या. असे संगितले.

चयापचय (मेटाबॉलिज्म )

थायरॉईड ग्रंथीचे मुख्य कार्य चयापचय आहे. हे तुम्ही खात असलेले अन्न पचवण्यास मदत करते आणि शरीराला आवश्यक पोषकद्रव्ये शोषून घेते. हे तुम्ही खाल्लेल्या अन्नाचे चयापचय करते आणि तुमच्या शरीरला ऊर्जा देण्याचे काम करते.

शरीराचे तापमान

असंतुलित थायरॉईड तुमच्या शरीराचे तापमान कमी करू शकते आणि या स्थितीत तुम्ही थंड असहिष्णुतेचे बळी होऊ शकता. सोप्या भाषेत सांगायचे तर, थायरॉईडच्या असंतुलनामुळे तुम्हाला थंड वाटू शकते.

वजन कमी होणे आणि वाढणे

जर तुमचे वजन डाएट प्लॅन आणि व्यायामाशिवाय अचानक कमी होत असेल, किंवा कमी खाल्ल्यानंतरही, वजन झपाट्याने वाढत असेल, तर तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांकडे जाऊन थायरॉईड तपासले पाहिजे. कारण थायरॉईड असंतुलनामुळे एकतर जास्त वजन कमी होऊ शकते किंवा वजन वाढू शकते.

केसांची वाढ

जेव्हा तुमचा थायरॉईड असंतुलित होतो, तेव्हा केस गळणे देखील सुरू होते. या रोगाला बळी पडल्यानंतर डोक्यावरचे केस तर पडतातच, पण पापण्या आणि भुवयाही पातळ होतात.

हृदय गती आणि मानसिक आरोग्य

थायरॉईड तुमच्या हृदयाचे ठोके नियंत्रित करण्यास देखील मदत करते. पण असंतुलित झाल्यानंतर त्याचा हृदयाच्या गतीवरही परिणाम होतो. या व्यतिरिक्त, थायरॉईड पातळीमध्ये असंतुलन झाल्यामुळे, तुमच्या शरीरातील कोर्टिसोलची पातळी देखील वाढते. ज्यामुळे मानसिक आरोग्य बिघडते. अशा परिस्थितीत तुम्ही तणाव आणि नैराश्याच्या स्थितीत जाऊ शकता.

गरोदरपणात समस्या

जर सतत प्रयत्न करूनही कोणी गर्भवती होत नसेल तर त्याचे कारण थायरॉईड असू शकते. थायरॉईड संतुलित केल्यानेच तुम्हाला गर्भधारणा होऊ शकते.

मासिक पाळीची समस्या

अनेक स्त्रियांचे मासिक पाळी योग्य वेळी येत नाही. प्रत्येक वेळी असे होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. कारण अनियमित मासिक पाळी देखील थायरॉईड असंतुलनाचे कारण असू शकते म्हणून तुम्ही ते तपासावे

त्यामुळे थायरॉईडचे संतुलन योग्य प्रमाणात ठेवावे.