चांगल्या आरोग्यासाठी पौष्टिक खाणे गरजेचे आहे. पौष्टिक अन्न शरीराला आवश्यक ते पोषक तत्व पुरवतात. अन्यथा शरीराची रोग प्रतिकारशक्ती कमी होते आणि ते आजार होऊ शकतात. त्यामुळे, चांगले खाणे गरजेचे आहे. फळ भाज्यांबरोबच सुखा मेवा आणि खजूर हे शरीराला ताकत देतात. मात्र खजूर कधी आणि कशा पद्धतीने घ्यावे हे माहिती असणे गरजेचे आहे, तेव्हाच त्याचा चांगला लाभ होऊ शकतो.
खजूरमध्ये मॅगनीज, मॅग्नेशियम आणि कॉपरसारखे तत्व असतात. अँटिऑक्सिडेन्टयुक्त असल्याने खजूर हे अल्जाइमर आणि कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारांना रोखण्यास मदत करू शकते. काही लोक खजूर पाण्यात भिजवलेले खजूर खातात तर काही लोक त्याला कच्चच खातात, मात्र ते उपाशी पोटी घेणे योग्य आहे का ? ते कधी खावे याबाबत जाणून घेऊया.
(Oil use : तेलाचा वापर टाळल्याने वजन कमी होते का? तज्ज्ञ म्हणाले..)
पोषक तत्वांनी युक्त खजूर कधी खावे
खजूरमध्ये लोह, फोलेट, प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे तत्व आहेत तर त्यामध्ये व्हिटॅमिन बी 6 हे जीवनसत्व आहे. या व्यतिरिक्त, ते खूप चवदार आहे आणि बहुतेक लोकांना ते गोड चवमुळे खायला आवडते. उपाशी पोटी खजूर खालल्यास फ्रुक्टोस हे पोट खराब करू शकते. जर तुम्हाला पचनासंबंधी समस्या असेल तर जेवल्यानंतर खजूर खालल्यास देखील पचनासंबंधी समस्या होऊ शकते. खजूरमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्याने हे होते. यामुळे पोट लवकर भरल्यासारखे वाटते, मात्र पाचनप्रक्रियेला खूप मोठा वेळ लागतो परिणामी सूजनची समस्या होऊ शकते.
जर तुम्हाला खजूरची अॅलर्जी असेल किंवा तुम्हाला लूज मोशल होत असतील तर तुम्ही खजूर खाने टाळले पाहिजे, कारण त्यात सोर्बिटोल नावाचे साखर अल्कोहोल मोठ्या प्रमणात असते जे समस्या वाढवू शकते. याबाबी सोडल्यास तुम्ही खजूर नाश्त्यात किंवा दिवसा कधीही खाऊ शकता. खजूर मणुक्या प्रमाणे फ्रेश किंवा सुकवून देखील खाता येऊ शकते.
खजूर सकाळी का खावे?
सकाळी खजूर खाल्ल्याने शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. सकाळी खजूर खाल्ल्याने आतड्यातील जंत नष्ट होण्यास मदत होते. याशिवाय खजूर आवश्यक अवयवांची स्वच्छता करण्यासही मदत करते. ते हृदय आणि यकृताचे आरोग्य सुधारते. याशिवाय खजूरमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेला आणि केसांना नैसर्गिक चमक देतात.
(आरोग्यासाठी गुणकारी आहे अक्रोड, शरीरासाठी धोकादायक ठरणाऱ्या ‘या’ पदार्थाला ठेवतो नियंत्रणात)
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)