tips and Tricks: आपल्यापैकी बरेच जण प्रेशर कुकरच्या शिट्टीनुसार भात शिजवतात. कारण कुकरची शिट्टीवरून आपल्याला समजते तुमचे शिजले आहे. पण कुकरमध्ये बिघाड झाला तर काय? अनेक वेळा कुकरची शिट्टी होत नाही आणि भात करपतो आणि त्याची चवदेखील बिघडते. कुकरमध्ये भात करपल्यामुळे तो तळाशी चिकटून राहतो, जो काढण्यासाठी खूप वेळ लागतो. इतकंच नाही तर काही वेळा ते काढण्यासाठी काही तासही लागतात. अशा परिस्थितीत भात शिजवण्यापूर्वी काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्हालाही अशा प्रकारची समस्या टाळायची असेल तर आम्ही दिलेल्या सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही भात कुकरमध्ये करपण्यापासून वाचवू शकता. कसे ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुकरमध्ये भात करपण्यापासून रोखण्याचे ३ उपाय

कुकरचे रबर तपासा: कुकरमध्ये तांदूळ शिजण्यापूर्वी त्याचे रबर नीट तपासणे अत्यंत आवश्यक आहे. कुकरच्या झाकणावरील रबर दाब निर्माण करण्याचे काम करते. त्यामुळे भात शिजणे सोपे जाते आणि जेव्हा जास्त वाफ असेल तेव्हा ती शिट्टीद्वारे बाहेर पडेल. रबर तपासून घेतला तर भात करपत नाही.

हेही वाचा – लाकडी फर्निचरवर स्क्रॅच पडलाय का? आक्रोडाचा छोटा तुकडा ठरेल उपयोगी; अगदी नव्यासारखे दिसू लागेल

शिट्टी तपासा: प्रेशर कुकरची शिट्टी भाज शिजवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान देते कारण कुकरमध्ये झालेले पदार्थ शिजतो ते शिट्टीमुळेच होते. कुकरची शिट्टी बरोबर नसेल तर जेवणाची चव खराब होऊ शकते. अशा वेळी कुकरमध्ये भात वगैरे ठेवताना सर्वात आधी शिट्टी तपासून घ्या. त्यामुळे भात कपरण्याचा धोका कमी होतो.

तेल घाला: अनेक वेळा घरातील प्रेशर कुकर नीट काम करत नाही, त्यामुळे भात किंवा इतर भाजी करपण्याचा धोका वाढतो. कारण बहुतेक लोक कुकरमधून बाहेर पडताना वाजणाऱ्या शिटीवरून भात शिजतो. अशा प्रकारे, जर तुम्हालाही भात करपण्याची शक्यता असेल तर एक चमचा तेल घाला. यामुळे तुमचा भात करपण्यासून वाचू शकतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips and tricks 3 easy ways to avoid burning rice in pressure cooker snk
Show comments