Effective tips to use waste Orange peel : आंबट-गोड संत्री खायला अनेकांना आवडते. संत्री खायला चविष्ट असतात पण त्यामध्ये अनेक पोषक तत्व आणि आरोग्यासाठी फायदे देखील समाविष्ट असतात. पण कित्येक चांगल्या गुणांनी भरपूर संत्र्याची साल तुम्ही फेकून देता का? बहुतेक लोक संतरी खाऊ त्याचे साल कचऱ्यामध्ये टाकून देतात पण तुम्ही असे करू नका. संत्र्याची सालीचा वापर त्वचेची काळजी घेण्यासाठी, साफसफाई आणि स्वयंपाक घरापासून गार्डनपर्यंत केली जाऊ शकते. काही सोपे पर्याय वापरून तुम्ही संत्र्याच्या निरुपयोगी समजणाऱ्या सालीचा वापर करू शकता.
संत्र्याची साल कशी वापरावी?
संत्र्याच्या सालीपासून फेस पॅक तयार करा – संत्र्याच्या सालीपासून फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला जास्त काही करावे लागत नाही, संत्र्याची साल उन्हात नीट वाळवा, बारीक करून त्यात मध किंवा गुलाबपाणी घालून चेहऱ्याला लावा. फेस पॅक प्रमाणे चेहऱ्यावर लावा. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळविण्याचा हा एक नैसर्गिक आणि आर्थिक मार्ग आहे.
जास्त काळ साखर साठवून ठेवण्यास उपयुक्त – संत्र्याच्या सालीचा वापर जास्त काळ साखर साठवण्यासाठी केला जाऊ शकतो. बेकिंगसाठी वापरला जाणारा ब्राऊन शुगरचा पॅक उघडल्यानंतर काही वेळातच खराब होऊ लागतो आणि त्यात गुठळ्या तयार होऊ लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही या साखरेच्या पाकीटात २ ते ४ संत्र्याची साले टाकू शकता, असे केल्याने साखर निरोगी राहते.
बागेत संत्र्याची साले वापरा – बागेत संत्र्याची साल अनेक प्रकारे वापरली जाऊ शकते. संत्र्याची साले सुकवून त्याची बारीक पेस्ट तयार करून ती खतामध्ये मिसळून झाडांची वाढ वाढते. जर तुम्हाला तुमच्या बागेचे कीटकांपासून संरक्षण करायचे असेल तर संत्र्याची साले खूप फायदेशीर आहेत. संत्र्याची साले लहान तुकडे करून झाडाभोवती टाका. यामुळे कीटक दूर राहतात.
स्वयंपाकघर स्वच्छ करण्यात प्रभावी – संत्र्याची साले किचन स्वच्छ करण्यासाठी आणि किचनमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. स्वयंपाकघरातील सिंकमध्ये शिळे अन्न अडकल्याने दुर्गंधी निर्माण होते, अशा वेळी संत्र्याच्या सालीने घासल्याने वास निघून जातो. स्वयंपाकघर स्वच्छ करण्यासाठी संत्र्याची साले पाण्यात टाका, थोडा वेळ उकळा आणि या पाण्याने स्वच्छ करा.