पावसाळ्यात ओलाव्यामुळे अंथरुणासह कपड्यांना देखील बुरशी पकडते. कपड्यांमध्ये ओलावा राहिल्याने ही बुरशी तयार होते. अशावेळी कपड्यांवर काळे, हिरवे डाग तयार होतात, जे सहजासहजी निघत नाहीत. यासह कपड्यांमधून दुर्गंधी येऊ लागते. अशा परिस्थितीत काही घरगुती गोष्टींचा वापर करून तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीने कपड्यांवरील बुरशीचे काळे-हिरवे डाग दूर करू शकता. चला तर मग हे सोप्पे उपाय जाणून घेऊ….
१) लिंबू-मीठचा करा वापरा
कपड्यांवरील बुरशीचे डाग काढण्यासाठी तुम्ही एक छोट्या भांड्यात पाणी, १- २ लिंबाचा रस आणि २-३ चमचे मीठ टाका. यानंतर त्यात बुरशी आलेले कपडे टाकून काही वेळ ते असेच राहू द्या, यानंतर ते घासून डाग साफ करा. यानंतर कपडे सामान्य पद्धतीने धुवा.
२) व्हाईट व्हिनेगरची मदत घ्या
कपड्यांवरील बुरशीचे डाग काढण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचाही वापर करू शकता. यासाठी अर्धी बादली पाणी घ्या आणि त्यात एक कप व्हाईट व्हिनेगर मिसळा. यानंतर यात बुरशी आलेले कपडे १ ते २ तास भिजत ठेवा. नंतर कापड घासून स्वच्छ करा आणि शेवटी डिटर्जंटने कपडे धुवा.
३) बेकिंग सोड्याने करा स्वच्छ
कपड्यांवरील बुरशीचे डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा देखील उपयुक्त ठरू शकतो. यासाठी थोडासा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोड्या पाण्यात टाका. यानंतर ही पेस्ट कपड्यांवरील डागांवर लावा आणि वीस मिनिटे राहू द्या. यानंतर कापड घासून स्वच्छ करा आणि वॉशिंग पावडरने सामान्य पद्धतीने धुवा.
४) बोरॅक्स पावडर उपयोगी येईल
बुरशी लागलेले कपडे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही बोरॅक्स पावडरचीही मदत घेऊ शकता. यासाठी तुम्ही डिटर्जंटच्या जागी बोरॅक्स पावडर वापरू शकता. बोरॅक्स पावडर हे एक रसायन आहे जे डाग काढून टाकण्यास मदत करते.
५) सिलिका जेल पाऊच कपाटात ठेवा
पावसाळ्यात कपाटातील कपड्यांना बुरशी येऊ नये म्हणून तुम्ही सिलिका जेल पाऊच वापरू शकता. हे पाऊच तुम्हाला कपाटातील कपड्यांमध्ये ठेवायचे आहेत. सिलिका जेल पाऊच हे तुम्हाला नवीन फोन, पर्स, शूज आणि चप्पल यासारख्या वस्तू खरेदी करता तेव्हा त्यांच्या बॉक्समध्ये मिळतात. हे पाऊच ओलावा शोषण्याचे काम करतात.
६) कडुलिंबाची पाने ठेवा
पावसाळ्यात फंगस आणि बॅक्टेरियापासून कपड्यांचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही कडुलिंबाची पाने देखील वापरू शकता. यासाठी काही कडुलिंबाची पाने स्वच्छ करून उन्हात वाळवावीत. त्यानंतर कपाटात ठेवलेल्या कपड्यांमध्ये ही पाने ठेवा. यामुळे कपड्यांचे फंगस आणि बॅक्टेरियापासून संरक्षण होईल.