आपल्या प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या प्रकारच्या पाण्याच्या बाटल्या असतात. काहीच्या घरात काचेच्या बाटल्या असतात तर काहींकडे प्लास्टिकच्या बाटल्या वापरल्या जातात. जेवढी बाटली बाहेरून स्वच्छ असते. तेवढी आतून देखील स्वच्छ असणे खूप गरजेचे असते. अन्यथा अनेक प्रकारचे धोकादायक जीवाणू त्यात जन्म घेऊ लागतात. पाण्याची बाटली आतून स्वच्छ कशी ठेवावी, अशाच काही पद्धती जाणून घेऊया.
गरम पाणी
प्लास्टिकच्या बाटल्यांवर जमा होणारी घाण खूप कठीण असते, त्यामुळे तुम्ही गरम पाणी वापरू शकता. त्याची मदत काचेच्या आणि स्टीलच्या बाटल्यांसाठीही घेता येईल. गरम पाणी थेट बाटलीत टाकू नका कारण यामुळे प्लास्टिक वितळू शकते आणि काच फुटू शकते. यासाठी तुम्ही एका मोठ्या धातूच्या भांड्यात पाणी काढा आणि नंतर त्यात एक एक वाटी टाकत राहा. यामुळे बाटल्या स्वच्छ होतील आणि हानिकारक जंतूही दूर होतील.
(हे ही वाचा : तुमच्या लघवीचा रंग स्पष्ट दिसत असेल तर वेळीच व्हा सावधान; होऊ शकतात ‘हे’ गंभीर आजार )
लिंबू, मीठ आणि बर्फ
जर तुम्हाला बाटली नीट स्वच्छ करायची असेल तर त्यासाठी तुम्ही अर्धी बाटली पाणी त्यात टाका. नंतर त्यात लिंबाचे चार तुकडे, मीठ आणि बर्फाचे तुकडे घालून चांगले हलवा. असे केल्याने बाटली पूर्णपणे स्वच्छ होईल आणि सर्व जीवाणू मरतील.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर
काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बाटल्या स्वच्छ करण्यासाठी आपण व्हिनेगर आणि बेकिंग सोड्याचाही वापर करू शकता. यासाठी बाटलीमध्ये दोन चमचे व्हिनेगर आणि एक चमचा बेकिंग सोडा मिसळून बाटलीचे झाकण लावा आणि चांगले हलवा आणि थोड्या वेळानंतर बाटली पुन्हा स्वच्छ पाण्याने नीट धुवा. असे केल्याने बाटली पूर्णपणे स्वच्छ होईल. अशाप्रकारे तुम्ही पाण्याची बाटली साफ करू शकता.
ब्रश वापरा
बाटली स्वच्छ करण्यासाठी बाटलीचा ब्रश वापरा. याच्या मदतीने बाटलीचा प्रत्येक भाग सहज स्वच्छ करता येतो. अनेक वेळा बाटलीच्या पृष्ठभागावर घाण राहते, ज्यामुळे बॅक्टेरिया वाढू शकतात. पण ही घाण ब्रशने सहज साफ करता येते.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)