पांढऱ्या मोत्यासारखे तेजस्वी दात केवळ सुंदरच दिसत नाहीत तर तुमच्या तोंडाच्या आरोग्याबद्दलही सांगतात. वयानुसार आपले दात पिवळे होऊ लागतात. याशिवाय दात पिवळे पडण्याची अनेक कारणे आहेत, जसे की दात स्वच्छ न करणे, धूम्रपान आणि चहा-कॉफी सारख्या कॅफिनयुक्त पदार्थांचे अतिसेवन.
दातांचे आरोग्य राखण्यासाठी दररोज दात स्वच्छ करणे आवश्यक आहे. दात सुंदर आणि पांढरे करण्यासाठी वर्षातून एकदा डॉक्टरांकडे जाऊन दात स्वच्छ करून घ्यावे असाही सल्ला दिला जातो. जर तुम्ही तुमचे दात पांढरे ठेवण्यासाठी डॉक्टरकडे जात नसाल तर काही घरगुती उपाय करून तुम्ही दात स्वच्छ ठेवू शकता. चला जाणून घेऊया दात पांढरे करण्यासाठी कोणते ४ प्रभावी घरगुती उपाय आहेत.
(हे ही वाचा: Workout Tips: ट्रेडमिलवर धावत असाल तर ‘या’ खास गोष्टी लक्षात ठेवाच!)
बेकिंग सोडा वापरा
दात स्वच्छ करण्यासाठी, एक चमचा बेकिंग सोडा आणि दोन चमचे हायड्रोजन पेरॉक्साइड मिसळा. ही पेस्ट दातांवर काही वेळ लावून ठेवा आणि नंतर धुवा. बेकिंग सोडा दातांचा पिवळेपणा दूर करेल. अमेरिकन डेंटल असोसिएशन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे समोर आले आहे की बेकिंग सोडा दात सुरक्षितपणे पांढरे करतो. इतकेच नाही तर बॅक्टेरियाशी लढण्यासाठी आणि दातांचे पिवळे पडणे कमी करण्यातही हे गुणकारी आहे.
हळद लावा
रात्री झोपण्यापूर्वी टूथब्रशच्या मदतीने हळद पावडर दातांवर लावा आणि काही वेळाने स्वच्छ धुवा. असे केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होतो.
(हे ही वाचा: खोलीत किती वॅट्सचा आणि कोणत्या प्रकारचा बल्ब लावावा? जाणून घ्या)
सफरचंद व्हिनेगर वापरा
सफरचंद सायडर व्हिनेगर दात स्वच्छ करण्यासाठी आणि दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी खूप प्रभावी आहे. सिचुआन युनिव्हर्सिटीच्या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की सफरचंद सायडर व्हिनेगरचा दातांवर ब्लीचिंग प्रभाव पडतो.सफरचंद सायडर व्हिनेगर वापरण्यासाठी, सुमारे २०० मिली पाण्यात २ चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर मिसळून माउथवॉश बनवा. हे माऊथवॉश ३० सेकंद तोंडात ठेवा आणि नंतर स्वच्छ धुवा. लक्षात ठेवा हा माउथवॉश जास्त वेळ तोंडात ठेवू नका.
(हे ही वाचा: मधुमेहाचा झोपेवरही होतो परिणाम, ‘या’ समस्या असतील तर करु नका दुर्लक्ष)
फळे आणि भाज्या खा
फळे आणि भाज्यांचे सेवन केवळ तुमच्या चांगल्या आरोग्यासाठीच नाही तर ते तुमच्या दातांसाठीही महत्त्वाचे आहे. फळे आणि भाज्या खाल्ल्याने दातांवरील प्लेक दूर होण्यास मदत होते. स्ट्रॉबेरी आणि अननस ही दोन अशी फळे आहेत जी तुमचे दात पांढरे करतात असा दावा केला जातो.
(हे सगळे उपाय करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्लाही आवश्य घ्या)