Mobile Addiction: आजच्या डिजिटल काळात केवळ मोठ्या व्यक्तीच नव्हे तर लहान मुलांनाही मोबाइलचे व्यसन लागले आहे. मोबाइलच्या या व्यसनामुळे मुलांच्या आरोग्यावर तर परिणाम होतोच, पण इतरही अनेक दुष्परिणाम होतात. गरजेपेक्षा जास्त वेळ ऑनलाइन असण्यामुळे अनेकांना नैराश्य, चिंता सारख्या समस्यांचा धोका निर्माण होतो आणि ऑनलाइन सायबर क्राईमला मुले बळी पडू शकतात. अशा परिस्थितीत पालकांनी मुलांचे हे व्यसन दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. अशाच काही टिप्स आहेत ज्या मुलांचे मोबाईलचे व्यसन दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतील.

मुलांच्या मोबाईलच्या व्यसनापासून सोडवण्याचे उपाय

स्क्रीन टाइम मर्यादित करा
मुले किती वेळ मोबाईल चालवू शकतात आणि त्याचा परिणाम वेळ ठरवण्यासाठी खूप गरजेचा आहे. मुलांना २ ते ५ वर्षांपर्यंत होऊ शकतो त्यामुळे स्क्रीन टाइम एक तासासाठी असला पाहिजे. ६ वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना स्क्रिन टाइम आई-वडिल आपल्या हिशोबाने सेट करू शकतात.

triphala in excess is beneficial or harmful for health
जास्त प्रमाणात त्रिफळाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत..
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
Itishri Expanding Horizons and Obstructing Frames
इतिश्री: विस्तारणारं क्षितिज आणि अडवणाऱ्या चौकटी
milkoscan fda marathi news
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना दुधातील भेसळ रोखण्यासाठी मिळणार मिल्कोस्कॅन यंत्र
e vehicle prices will remain under control even without subsidy says nitin gadkari
अनुदानाविनाही ई-वाहनांच्या किमती आटोक्यात राहतील -गडकरी
Is blackcurrant and chia seed water really beneficial for health Get expert advice l काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
article about weakness problem in wome causes of weakness in women
स्त्री आरोग्य : बायांनो, तुम्हाला विकनेस जाणवतो?
effective treatment on psoriasis with side effects advice from dermatologist
सोरायसिसवर आता प्रभावी उपचार अन् दुष्परिणामही कमी! त्वचाविकारतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…

मुलांना फिजिकल अॅक्टिव्हिटीसाठी प्रोत्साहित करा
मुलांना जितके होईल तितके मैदानी खेळ किंवा पार्कमध्ये फिरण्यासाठी प्रोत्साहित करा. मित्रांबरोबर फिरायाला जाण्यासाठी प्रोत्साहित करा. पोहायला प्रोत्साहित करा. मुलांची जितके लक्ष खेळण्यामध्ये राहील तित कमी लक्ष मोबाइलमध्ये जाईल.

हेही वाचा- पावसाळ्यात वाढू शकतो मायग्रेनचा त्रास, हे टाळण्यासाठी जाणून घ्या सोपे उपाय

पालक म्हणून त्यांचा आदर्श व्हा
तुमच्या मुलांना मोबाईल फोनपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही स्वतः एक चांगले आदर्श होऊ शकता. जेव्हा तुम्ही कोणतेही अन्न खाता किंवा मुलांबरोबर असता तेव्हा फोन न वापरण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतः फोनवर बिझी असाल तर मुलंही तसंच करतील.

मनोरंजनासाठी दुसरे काहीतरी निवडा
मुलं फोन बहुतेक फक्त त्यांच्या मनोरंजनासाठी मोबाइल वापरतात. जर तुम्ही मुलाला मनोरंजनासाठी मोबाईल दिला तर तो सगळा वेळ त्यातच वाया घालवतील. अशास्थितीमध्ये असे मोबाइलशिवाय इतर मनोरंजनाचे पर्याय निवडा जसे की, पुस्तक वाचा, गाणी ऐका, चित्र काढा.

हेही वाचा – फक्त एक रुपयाच्या ‘या’ वस्तूने साखरेला लागलेल्या मुंग्या पळवा झटक्यात

संगणक अभ्यासासाठी चांगला आहे
मुलांना अभ्यासासाठी मोबाईल देण्यापेक्षा तुम्ही त्यांना संगणक किंवा लॅपटॉप देऊ शकता. संगणक किंवा लॅपटॉपमध्ये सुरक्षा आणि अँटी-व्हायरस सेट करू शकता आणि मुले काय पाहत आहेत आणि काय नाही यावर पालक देखील चांगले निरीक्षण करू शकतात. यामुळे मोबाईलचे व्यसनही दूर होईल.