काळ्या पायांची समस्या दूर करण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. मात्र, अपेक्षित परिणाम न मिळाल्यास निराश होतात. तुमचे पाय काळे असतील तर निराश होऊ नका. त्यांना उजळ देण्यासाठी काही उपाय तुमच्या पुढे मांडत आहोत. हे उपाय घरगुती असून ते डेड स्किनची समस्या देखील दूर करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काळे पाय स्वच्छ कसे करावे?

चेहऱ्याबरोबरच पायांची सुंदरता संपूर्ण शरीराला आकर्षक बनवते. काळ्या पायांना उजळ देण्यासाठी काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. काळ्या पायांची समस्या दूर करण्यासाठी बेकिंग सोडा, मीठ, पाणी आणि कोरफड लागेल.

(Pimples treatment : फोडे पिंपल्सवर बाबा रामदेव यांचा ‘योग’ उपचार, ‘ही’ आसने ठरू शकतात फायदेशीर)

  • एक बकेट घ्या. ती पाण्याने अर्धी भरून घ्या. आता त्यात कोरफडचे जेल, बेकिंग सोडा आणि मीठ टाका.
  • आता आपल्या पायांना थोडावेळ त्या पाण्यात राहू द्या.
  • आता तुमचे पाय घासल्यानंतर, तुमचे पाय बादलीतून बाहेर काढा आणि ते स्वच्छ करा.
  • आता तुमच्या पायांना टोवेलने स्वच्छ पुसा आणि त्यानंतर मॉइश्चरायझरचा वापर करा.

वरील उपाय हा काळ्या पायांची समस्या दूर करण्यास मदत करू शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा. बेकिंग सोड्यामुळे तुमच्या पायांना रॅशेज होऊ शकतात, त्यामुळे जास्त वेळ पाण्यात पाय बुडवून ठेऊ नका. याशिवाय या उपायामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास किंवा तुमच्या पायाला जखमा असल्यास हे पाणी वापरू नका, अन्यथा समस्या वाढू शकते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)