Diwali 2022 Cleaning : दिवाळीमध्ये घर निटनेटके दिसावे यासाठी लोक स्वच्छता करतात, भिंतींना रंग मारतात. किचनची स्वच्छता करतात. या कार्यात बाथरूम आणि किचनमधील प्लम्बिंगच्या कामांना पण प्राधान्य दिले पाहिजे. सिंकचे पाईप चोक झाल्यास त्यातून पाण्याचा निचरा होत नाही. खराब पाणी सिंकमध्ये जमा राहते. याने भांडे इत्यादी वस्तू धुतांना गैरसोय होऊ शकते. बाथरूम आणि किचन सिंकचे पाइप जाम झाल्यास पुढील उपयाने ते स्वच्छ करता येऊ शकतात.

(Diwali cleaning : भिती, टाइल्सवरील तेलाचे डाग झटपट मिटवण्यासाठी करा ‘हे’ उपाय, किचन दिसेल चकचकीत)

Ants in a box of rice
Kitchen Hacks: तांदळाच्या डब्याला मुंग्या लागल्यात? ‘हे’ सोप्पे उपाय मुंग्यांना पळवून लावतील
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
municipal administration launched Kacharamukt Tas campaign
कचरामुक्त तास मोहिमेतून ६४ मेट्रिक टन कचऱ्याचे संकलन, १ हजार ४३९ कामगार, कर्मचाऱ्यांची कामगिरी
Garbage collection, pune , Garbage collection night ,
पुणे शहरात आता रात्रीही होणार कचरासंकलन, हे आहे कारण ?
bmc launched cleanliness drive to clean Mumbai
महापालिकेने घेतला शहर स्वच्छतेचा वसा, दररोज स्वच्छता मोहीम राबविण्याचा महापालिकेचा निर्णय
kitchen tips hacks how to clean kitchen utensils shiny
Kitchen Hacks : चपातीमुळे काळा पडलेला, खराब झालेला तवा काही मिनिटांत होईल चकाचक; वापरा फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स
Car Cabin Bad Smell
तुमच्याही गाडीमध्येही सतत घाणेरडा दुर्गंध येतो? मग एका स्वस्तातल्या सोप्या उपायाने गाडी आतून होईल फ्रेश
Municipal administration to clean 23 ponds in Thane
ठाण्यातील २३ तलावाची होणार सफाई; पाण्यावरील तरंगता कचरा केला जाणार साफ

१) बेकिंग सोड्याचा वापर

बेकिंग सोडा ड्रेनेजची समस्या दूर करण्यात मदत करू शकते. यासाठी एका भांड्यात दोन चमचे बेकिंग सोडा आणि एक चमचा विनेगर टाकून त्याचे मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण सिंकच्या ड्रेनेज पाईपमद्ये टाका आणि त्यामध्ये वरून अतिरिक्त एक चम्मच बेकिंग सोडा टाका. यास १० ते १५ मिनिटे राहू द्या. त्यानंतर सिंकमध्ये गरम पाणी टाका. विनेगर आणि सोडा सिंकच्या पाईपला स्वच्छ करण्यात मदत करते, आणि कचरा बाहेर काढते.

२) इनोचा वापर

गॅस, अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेसाठी इनोचा वापर केला जातो. परंतु, इनोच्या वापराने तुम्ही सिंकचे ड्रेनेज देखील ठीक करू शकता. यासाठी एका कटोरीमध्ये इनो आणि पाण्याचे मिश्रण तयार करा. या मिश्रणाला सिंकच्या पाईपमध्ये टाका आणि कमीत कमी अर्धा तास राहू द्या. त्यानंतर अजून एक ते दोन चम्मच पांढरे विनेगर टाकून त्यास १० मिनिटांसाठी सोडून द्या. त्यानंतर त्यात गरम पाणी टाका. याने सिंकच्या पाईपमधील घाण बाहेर काढण्यात मदत होऊ शकते.

(गर्भवती असताना डॉक्टरांना विचारूनच घ्या ‘ही’ गोळी, सेवनाने बाळाच्या विकासात येऊ शकते बाधा)

३) कोल्ड ड्रिकचा वापर

कोल्ड ड्रिंकने सिंकचा पाइप स्वच्छ करण्यास मदत होऊ शकते. यासाठी कोल्ड ड्रिंकमध्ये थोडं बेकिंग सोडा टाका आणि त्यास सिंकच्या पाइपमध्ये टाका आणि काही वेळासाठी तसेच राहू द्या. त्यानंतर यास गरम पाण्याने स्वच्छ करा. याने सिंकच्या पाइपमधील घाण साफ करण्यात मदत होऊ शकते.

Story img Loader