आलं लसूण हे स्वयंपाकातले दोन अविभाज्य घटक आहेत. हे दोन घटक जेवणाची संपूर्ण चव बदलून टाकतात. पण लसूण केवळ जेवणाची चव वाढवत नाही तर तुमचं आरोग्य देखील वाढवण्यास मदत करेल. लसणामधील सर्व घटकांचा उपयोग जर तुम्हाला करून घ्यायचा असेल तर आहारतज्ज्ञ रिधिमा बात्राने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओ मधून आपल्याला लसूण वापरण्याची योग्य पद्धत कोणती हे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांनी सांगितल्यानुसार लसणाच्या पाकळ्या कधीही अखंड वापरू नका. लसूण वापरतांना आधी त्याचे तुकडे करा, बारीक चिरा किंवा ठेचून दहा मिनिटं बाजूला ठेवा. यामुळे त्यात असणारे एंझाइम सक्रिय होण्यास मदत होते. एंझाइमच्या या प्रक्रियेमुळे कँसरचा धोका कमी होतो, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते, हृदयरोगापासून संरक्षण होते, त्याचसोबत रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

हेही वाचा : मॉडर्न युगाचे मॉडर्न पेरेंटिंग: मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी ‘या’ पाच टिप्स लक्षात ठेवा

त्यामुळे पुढच्या वेळेस लसूण वापरतांना, ते बारीक चिरून किंवा ठेचून दहा मिनिटं बाजूला ठेवून नंतरच त्याचा उपयोग करा. आणि त्यात असणाऱ्या सगळ्या घटकांचा पूर्ण फायदा करून घ्या.

आता लसणाचे अजून काही फायदे आहेत ते सुद्धा बघू.

१. लसणामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी- इंफ्लेमेटरी घटक असल्याने ते मेंदूसाठी खूपच उपयुक्त असतात.
२. लसूण कच्च खाल्याने पोटाच्या समस्या दूर होतात आणि पचनास मदत होते.
३. लसूण खाल्याने तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips to cook garlic in correct way to get all the goodness for your heath and skin dha
Show comments