Monsoon tips how to dry umbrella : पावसाळा सुरू झाला आहे. मुसळधार पावासामुळे तुमच्या आरोग्यापासून तुमच्या फॅशनवरीही परिणाम होतो. पावसाळ्यात कपडे आणि छत्री सुकत नाही त्यामुळे खूप चिडचिड होते. कुठेही बाहेर जायचे असेल आणि ओल्या छत्री घेऊन फिरणे त्रासदायक ठरते. छत्री सुकवण्यासाठी कसरत करावी लागते ती वेगळी. काळजी करू नका आम्ही तुम्हाला आ काही सोपे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमची छत्री पटकन सुकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

छत्री कशी सुकवावी

मुमुसळधार पाऊस आणि दमट हवामानात कपडे सुकवणे तसेच ओल्या छत्री सुकवणे खूप त्रासदायक असते. तुम्हालाही छत्री लवकर सुकवायची असेल तर पावसाळ्यात छत्री सुकवण्यासाठी हे उपाय पहा

  • पावसाळ्यात ओल्या आणि घाणेरड्या छत्रीला लवकर सुकवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे तो हलक्या हाताने झटकून घ्या किंवा उन्हात ठेवा.
  • ऊन नसेल तर ओली छत्री तुम्ही अशा ठिकाणी ठेवू शकता जिथे वाहता वारा आहे. कारण पावसाळ्यात ऊन नसले तरी वारा नक्कीच असतो.
  • ओली छत्री सुकवण्यासाठी जर बाल्कनी ओली असेल तर तुम्ही छत्री टब किंवा शॉवरच्या ठिकाणी सुकवू शकता.
  • जर छत्री लवकर सुकायची असेल तर या नेहमी छत्री खोलून सुकवा अर्थातच तुमची छत्री खूप कमी वेळात सुकेल.
  • छत्रीच्या सुकवण्यासाठी योग्य वेंटिलेशन देखील खूप महत्वाचे आहे, कारण हवा खेळती राहणे खूप महत्वाचे आहे.
  • जेव्हा छत्री सुकवता तेव्हा ती नेहमी अशा ठिकाणी लटकवा जिथे पाणी टपकण्याची समस्या नाही.

या सोप्या पद्धतींचा अवलंब केल्यास तुमची छत्री लवकर सुकते आणि वास येणार नाही किंवा घाण होणार नाही.

ओल्या छत्रीबरोबरच कपडेही ओले झाले असले ते लवकर वाळवण्याची गरज आहे. पंखा किंवा थंड हवेने ते वाळवता येतात. ओल्या कपड्यांचा वास दूर करण्यासाठी पावसाळ्याच्या दिवसात कपड्यांसोबत मीठाने भरलेली पिशवी खोलीत ठेवा. यामुळे तुमच्या कपड्यांमधील ओलावा निघून जाईल आणि कपडे लवकर कोरडे होतील. व्हिनेगर आणि धूप वापरणे देखील प्रभावी ठरू शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips to dry wet umbrellas quickly during monsoon snk
Show comments