Tips to get rid of houseflies : घरात घोंगावणाऱ्या माश्या या त्रासदायक तर असतातच शिवाय ते अनेक आजारांना आमंत्रण देऊ शकतात. माश्यांमुळे संसर्गाचा धोका असतो. अन्नावर बसलेल्या माश्यांमुळे संसर्गजन्य रोग होऊ शकतात. त्यामुळे, किचनमध्ये त्यांचा वावर तर थांबवायलाच हवा. माश्यांचे आयुष्य हे फार छोटे असते, मात्र कमी वेळेत त्यांची संख्या फार वाढते. तुम्ही जर त्यांच्यापासून सुटका मिळवू इच्छित असाल तर आज आम्ही तुम्हाला काही उपाय सूचवत आहोत. याद्वारे घरातून माशा दूर पळवण्यात मदत होऊ शकते.
१) मिठाचे पाणी
एका ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे मीठ टाकून त्यास मिसळून घ्या. हे पाणी कोणत्याही स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि त्याच्या सहायाने माश्यांवर शिंपडा. घरातून माशी दूर करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
(कमी वयात दाढी पांढरी होण्यामागे ‘ही’ आहेत कारणे, जाणून घ्या उपाय)
२) तुळस
घरातून माश्या दूर करण्यासाठी तुम्ही तुळशीचा वापर करू शकता. यासाठी सर्वात आधी तुळशीच्या पानांची पेस्ट बनवा. नंतर स्प्रे बॉटलमध्ये पाणी टाकून त्यात पेस्ट टाका आणि मिसळा. हे मिश्रण घरात शिंपडल्यास माश्यांपासून सुटका मिळू शकते.
३) मिर्चीचा स्प्रे
मिर्चीच्या तिखट वासाने माश्या पळून जाता. यासाठी ६ ते सात सुक्या लाल मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करा आणि नंतर त्यास पाण्यात मिसळून स्प्रे बॉटलमध्ये टाका. हे मिश्रण घरात शिंपडा. या उपयाने माश्यांपासून सुटका मिळू शकते.
४) कापूर
माश्यांपासून सुटका मिळण्यासाठी कापूर फायदेशीर ठरू शकते. १० ते १२ कापूर घ्या आणि त्यांना बारीक करून त्याचे पावडर तयार करा. एका बाऊलमध्ये पाणी घ्या आणि त्यात हे पावडर मिसळा. हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये टाकून ते घरात शिंपडा.
५) आले
४ कप पाण्यामध्ये २ मोठे चमचे आल्याची पेस्ट किंवा सुंठ पावडर टाकून त्यास एकत्र करा. हे मिश्रण गाळून स्प्रे बॉटलमध्ये मिसळा आणि माशा येतात त्या ठिकाणी स्प्रे करा.
(वाढलेले युरिक अॅसिड ठरू शकते संधिवाताचे कारण, कमी करण्यासाठी करा ‘हा’ आयुर्वेदिक उपाय)
६) अॅपल सायडर व्हिनेगर
घरातून माश्या दूर करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर फायदेशीर ठरू शकते. अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये निलगिरीचे तेल घाला आणि ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. हे मिश्रण माश्या येतात त्या ठिकाणी शिंपडा.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. बातमीतील उपाय करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)