लोह हा रासायनिक घटक मानवी शरीरामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतो. लोह हा हिमोग्लोबिनमध्ये असणारा एक अतिशय महत्वाचा घटक आहे. लाल रक्तपेशींमध्ये सापडणारे हे प्रोटीन, शरीराच्या प्रत्येक भागात प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन नेण्याचे काम करत असतो. अनेकदा स्त्रियांच्या शरीरात लोहाची पातळी कमी असल्याने त्यांच्यामध्ये लोहाच्या कमतरतेची समस्या बघायला मिळते.

मासिकपाळीदरम्यान बाहेर पडणाऱ्या रक्ताद्वारे शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होत असते, म्हणूनच अशा वेळेस लोहयुक्त पदार्थ खाऊन, शरीरातील कमी झालेल्या लोहाचे प्रमाण पुन्हा वाढवणे गरजेचे असते. त्याचसोबत गर्भवती महिलांसाठीसुद्धा शरीरातील लोहाचे प्रमाण योग्य असणे अत्यंत महत्वाचे असते. अशा अवस्थेत गर्भात वाढणाऱ्या बाळाला सुदृढ ठेवण्यासाठी, बाळ बाहेर येताना होणारा रक्तस्त्राव अशा सर्व गोष्टींसाठी स्त्रियांच्या शरीरामध्ये लोहाचे योग्य प्रमाण आवश्यक असते.

Tejaswini Bhavan in Akola built with contributions from mahila bachat gat and Sadhan Kendra
अकोला : बचत गटातील महिलांच्या योगदानातून ‘तेजस्विनी’ महाराष्ट्रातील एकमेव पथदर्शी उपक्रम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Counseling center for victimized women in Thane district
ठाणे जिल्ह्यात पीडित महिलांसाठी समुपदेशन केंद्र
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Ladki Bahin Yojana Pune, Pune District women Ladki Bahin, Ladki Bahin Yojana benefit,
Ladki Bahin Yojana Pune : पुणे जिल्ह्यात ५० हजार ‘बहिणी’ ‘लाडक्या’ होण्याच्या प्रतीक्षेत!
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
sex ratio of birth in nashik municipal corporation
जिल्ह्यात लिंगोत्तर प्रमाणात घट; लिंग चाचणीची दक्षता समिती बैठकीत साशंकता

शाकाहारी पदार्थांमधून मिळणाऱ्या लोहापेक्षा, शरीर मांसाहारातील लोह पटकन शोषून घेते. त्यामुळे ज्या महिला शाकाहारी आहेत किंवा व्हेगन आहार घेतात, त्यांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे. पण काळजी करू नका, रोजच्या सवयींमध्ये थोडाफार बदल केल्याने लोहाचे प्रमाण व्यवस्थित राहण्यास मदत होऊ शकते. शरीरातील लोहाचं प्रमाण कशाप्रकारे सांभाळता येऊ शकतं ते बघू.

हेही वाचा : केस सारखे रंगवून केसांची झालीये वाईट अवस्था? मग पाहा एक्स्पर्टसने दिलेला सल्ला…

शरीरातील लोहाची कमतरता कशी भरून काढता येईल?

१. आहारात लोहयुक्त पदार्थांचा समावेश करा :

आपल्या रोजच्या आहारात ज्या पदार्थांमध्ये लोहाचे प्रमाण अधिक आहे, अशा गोष्टींचा समावेश करा. उदाहरणार्थ : मांस, मासे, अंडी, टोफू, पालक, डाळी, ब्रोकोली, पाव इत्यादी पदार्थांचे सेवन करा.

२. लोहयुक्त पदार्थ आणि व्हिटॅमिन सी :

लोहयुक्त पदार्थांसोबत व्हिटॅमिन सीचे सेवन केल्याने शरीरात लोह पटकन शोषून घेतले जाते. फळांसोबत जर लोहयुक्त पदार्थांचे सेवन केले, तर त्याचा फायदा अधिक होतो.

३. लोहाचे प्रमाण कमी करू शकणारे पदार्थ टाळा :

चहा, कॉफी किंवा ज्या पदार्थांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते, असे पदार्थ लोहयुक्त पदार्थांसोबत खाणं टाळा. शक्य असल्यास अशा पदार्थांचे कमी सेवन करा. चहा, कॉफीसारखे पदार्थ शरीरात लोह शोषून घेण्याच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण करतात.

४. लोखंडी भांड्याचा वापर करा :

ज्या पदार्थांमध्ये आम्लीय [acidic] घटक असतात, उदाहरणार्थ टोमॅटोसारखे पदार्थ, त्यांना लोखंडी कढई किंवा पातेल्यात बनवावे. अशा भांड्यांमध्ये अन्न शिजवल्याने पदार्थांमधील लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

५. आयर्न सप्लिमेंट्स

काहीवेळेस शरीरात लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी आयर्न सप्लिमेंट्सचादेखील वापर केला जातो. या सप्लिमेंट्स महिला गरोदर असताना वापरण्याचा सल्ला बऱ्याचदा दिला जातो. परंतु, अशा प्रकारच्या सप्लिमेंट्सचा वापर करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे अतिशय महत्वाचे असते.

६. मासिकपाळीदरम्यान विशेष काळजी घेणे :

ज्या महिलांना मासिकपाळीदरम्यान अधिक रक्तस्त्राव होतो किंवा ज्यांची मासिकपाळी अधिक दिवसांपर्यंत सुरू असते, अशा महिलांनी विशेष काळजी घेणं गरजेचं असत. कारण – अशावेळी अधिक प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण आपसूक कमी होते, परिणामी लोहाची कमतरता जाणवू लागते. त्यामुळे मासिकपाळीदरम्यान लक्ष ठेवा आणि गरज असल्यास डॉक्टरांची मदत घ्या.

७. जीवनसत्व बी १२ चे सेवन वाढवा :

बी १२ हे जीवनसत्व शरीरात लोह शोषून घेण्यासाठी खूप उपयुक्त असते. त्यामुळे या जीवनसत्वाचे सेवन शरीरासाठी अत्यंत उपयोगी आहे. बी १२ हे जीवनसत्व मासे, मांस, दुग्धजन्य पदार्थ इत्यादींमधून मिळते.

८. लोखंडी तव्याचा वापर

लोखंडी कढईप्रमाणेच लोखंडी तव्याचा वापर अन्न शिजवताना केल्यास आहारात थोड्याफार प्रमाणात लोहाचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

९. पोट निरोगी हवं :

पोट साफ नसल्यास किंवा पोटाच्या तक्रारी असल्यास लोह शरीरात शोषून घेण्यासाठी अडथळा तयार होतो. त्यामुळे आहारात प्रोबायोटिक्स आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा.

१०. शरीरातील लोहाचे प्रमाण तपासा :

तुम्हाला जर शरीरात लोहाची कमतरता जाणवत असेल किंवा तुम्हाला आधीपासूनच लोहाच्या कमतरतेची समस्या असेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क करा, त्यांची मदत घ्या. वेळोवेळी लोहाची पातळी तपासून घ्या. या व्यतिरिक्त इतर काही त्रास असल्यास तो देखील डॉक्टरांना सांगा.

या सर्व गोष्टींव्यतिरिक्त एक अत्यंत महत्वाची गोष्ट अशी की, काहीही झालं तरी स्वतःहूनच आपल्यात लोहाची कमतरता आहे आणि म्हणून सप्लिमेंट्स सुरू करू नका. तुम्हाला थोडी जरी शंका असेल, तर आधी डॉक्टरांची मदत घ्या. डॉक्टरांचा सल्ला हाच सर्वात महत्वाचा असतो. तुम्हाला काय होत आहे आणि त्यावर कोणत्या उपचारांची आवश्यकता आहे, हे केवळ तुमचे डॉक्टर सांगू शकतात. त्यामुळे त्यांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही गोष्ट करू नये.

टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित असून, कृपया याला वैद्यकीय सल्ला समजू नये. तुमच्या आरोग्याविषयी कोणत्याही प्रकारची शंका असल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Story img Loader