Monsoon 2023: पावसाळ्यात सर्व खाद्यपदार्थ वाया जातात. या ऋतूमध्ये खाद्यपदार्थ नीट ठेवणे खूप कठीण आहे. पावसाळ्यात आपल्या सर्वांना चहासोबत बिस्केट आणि स्नॅक्स आस्वाद घ्यायचा असतो, पण पावसाळ्यात स्नॅक्स सादळतात कारण या काळात हवेत आद्रता जास्त असते. तसेच कित्येकदा आपल्या ष्काळजीपणा आणि चुकीच्या सवयींमुळे देखील स्नॅक्स आणि बिस्कटे सादळतात. अशा परिस्थितीत, ते टाळण्यासाठी काय करावे हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही स्नॅक्स ताजे आणि कुरकुरीत ठेऊ शकाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या पद्धतींनी स्नॅक्स ताजे आणि कुरकुरीत ठेवा

काचेचे भांडे वापर
पावसाळ्यात प्लास्टिकच्या डब्याऐवजी काचेच्या भांड्यांचा वापर करा. काचेच्या बरणीत स्नॅक्स ठेवल्याने ते दीर्घकाळ ताजे आणि कुरकुरीत राहण्यास मदत होते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला खाण्यापिण्याची खूप आवड असेल तर या गोष्टी काचेच्या बरणीत साठवा.

हेही वाचा – पावसाळ्यात ‘व्हिटॅमिन डी’ची कमतरता दूर करण्यासाठी आहारात करा ‘हे’ ३ मोठे बदल

ओलावा पासून दूर ठेवा
स्नॅक्स ओलसर ठिकाणांपासून दूर ठेवा. ओलसर ठिकाणी ठेवल्यास ते लवकर ओलसर होऊ शकते. बरेच लोक चिप्स, शेव सारखे स्नॅक्स डब्यात टाकतात आणि जमिनीवर ठेवतात. असे करणे टाळा. डब्बा मांडणीवर किंवा खिडकीवर ठेवा.

सूर्यापासून संरक्षण कराउन्हात स्नॅक्स ठेवल्याने बिघडत नाही, असा अनेकांचा समज आहे, पण त्यांचा हा विचार चुकीचा आहे. हे अजिबात करू नका. असे केल्याने नमकीन लवकर खराब होऊ शकते.

हेही वाचा- टोमॅटोनंतर आता महागले आले! आता घरच्या घरी आले कसे लावावे? जाणून घ्या ‘ही’ सोपी पद्धत

बरणी जास्त वेळ उघडी ठेवू नका
बरणी जास्त वेळ उघडी ठेवल्याने काही वेळा बिस्केट किंवा स्नॅक्स सादळतात. अशावेळी बरणी जास्त वेळ उघडी ठेवू नका.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips to prevent snacks and biscuits from moisture during monsoon season snk
Show comments