Tips to save Electricity at home: एप्रिल सुरू झाला असून, उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. कडक उन्हापासून वाचण्यासाठी लोक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळताना दिसतात. अशा स्थितीत वीज बिलात वाढ होणे स्वाभाविक आहे. उन्हाळ्यात एसी आणि कूलरच्या अधिक वापरामुळे वीज बिलात वाढ होते. त्यामुळे खिशावरचा आर्थिक भार वाढतो. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत; ज्यांच्या मदतीने तुमचे दर महिन्याचे वीज बिल २०-३० टक्क्यांनी कमी येईल.रोजच्या वापरात काही बेसिक गोष्टींची काळजी घेतली तर लाईटबिल जास्त येणारच नाही आणि विजेचीही बचत होईल. जुने झालेले पंखे, फ्रिज किंवा इतर मशिन्स लाईट बील जास्त वाढवतात.

कोणत्याही उपकरणाचा मेन स्विच बंद करा

तुम्ही खोलीच्या बाहेर निघता तेव्हा लाईट किंवा इतर इलेक्ट्रोनिक्सच्या वस्तू बंद करायला विसरू नका. फोन चार्जर, लॅपटॉप या डिव्हाईसचा वापर होत नसेल आणि स्विच ऑन असेल तरीही बील येत जातं. म्हणून वापर झाल्यानंतर बटन्स बंद करायला विसरू नका. चार्जिंग झाल्यानंतर बटन्स न विसरता बंद करा.

बल्ब चेंज करा

एलईडी लाईट बल्ब ट्रेडिशनल बल्बच्या तुलनेत विजेची बचत करतात. ज्यामुळे लाईटबील कमी येते आणि दीर्घकाळ चालतात ज्यामुळे लाईट्ससाठी वारंवार पैसे घालवावे लागत नाहीत.

एसीची सेटिंग

जेव्हा ऊन्हाळा सुरू होतो तेव्हा एसी, कुलरची गरज लागतेच. अशावेळी लाईटबील खूप जास्त येऊशकतं. अशावेळी तुम्हाला लाईटबील कमी करण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स फॉलो कराव्या लागतील जसं की २४ डिग्रीवर एसी सुरू ठेवा. जेणेकरून वेळोवेळी ऑफ होत राहील.

एसीच्या टेम्परेचरकडे लक्ष द्या

उन्हाळ्यात एसीचे टेम्परेचर नेहमी २४ ते २६ अंश सेल्सिअस ठेवावे. त्यामुळे कूलिंग चांगल्या प्रकारे होते आणि जास्त वीजही लागत नाही. ‘लक्षात ठेवा टेम्परेचर जितके कमी कराल तितकी वीज जास्त वापरली जाईल आणि बिल जास्त येईल. त्यामुळे तुम्ही चांगल्या परिणामांसाठी टायमर सेट करू शकता.

५ -स्टार रेडेट फ्रिज

आपल्या घरातील जुन्या वस्तू अपग्रेड करून तुम्ही जवळपास ४० टक्के वीज वाचवू शकता. जर तुम्ही साधारण फ्रिजऐवजी ५ स्टार रेटेड फ्रिजची निवड केली तर विजेचे बील ३० टक्क्यांनी कमी होईल. जुन्या फ्रिजमध्ये वारंवार प्रोब्लेम्स उद्भवतात कधी जास्त बर्फ तयार होतो तर कधी कुलिंग व्यवस्थित होत नाही अशावेळी तुम्ही नवीन फ्रिज घेण्याचा विचार केलात तर पैसे आणि वीज दोन्हींची बचत होईल.