रंगवलेली नखे म्हणजे स्त्रीच्या सौंदर्यात भर घालणारा आणखी एक दागिना. नेलपॉलिश लावल्याने नखे आकर्षक आणि सुंदर दिसतात. याने स्त्रीचे सौंदर्य अधिक खुलते. मात्र, बोटांना लावलेली नेलपॉलिश काढताना ती योग्य पद्धतीने काढली गेली नाही तर बोटं पुन्हा खराब दिसू लागतात. वारंवार नेल रिमूव्हरने नेलपॉलिश काढण्यामुळे नखांचे आरोग्यही बिघडू शकते. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत असे काही घरगुती उपाय शेअर करत आहोत. ज्याने तुम्ही तुमची नेलपॉलिश सहज काढू शकता आणि त्यामुळे नखं अथवा बोटांवर दुष्परिणाम देखील होत नाहीत. जाणून घ्या नेलपॉलिश काढण्याचे काही घरगुती उपाय.

  • अल्कोहोल
    जर घरात अल्कोहोल असेल तर त्याचे काही थेंब नखांवर टाका आणि एखाद्या सुती कपड्याने पुसून घ्या. नेलपॉलिश पूर्णपणे निघून जाईल.
  • सॅनिटायझर
    नेलपॉलिश काढण्यासाठी हँड सॅनिटायझर हा एक उत्तम पर्याय आहे. कोमट पाण्यात नखे बुडवून सुरुवात करा. आता सॅनिटायझरमध्ये कापसाचा गोळा भिजवा आणि सर्व नेलपॉलिश स्क्रब करा. उरलेला पेंट काढण्यासाठी तुमच्या नखांना मसाज करा.

(हे ही वाचा : दर महिन्याला मासिक पाळीची तारीख का बदलते? ‘ही’ आहेत कारणे, ‘या’ फळांनी करा Irregular Periods वर नैसर्गिक उपचार)

  • गरम पाणी
    जर घरात अल्कोहोल किंवा व्हिनेगार नसेल तर गरम पाण्याचा वापर करून तुम्ही बोटांवरील नेलपॉलिश काढू शकता. एका वाटीत गरम पाणी घ्या. दहा मिनिटे गरम पाण्यात बोटे बुडवून ठेवा. त्यानंतर कॉटनच्या सहाय्याने नेलपॉलिश पुसून घ्या.
  • लिंबाचा रस
    जर तुमच्याकडे व्हिनेगर नसेल तर फक्त लिंबाच्या रसानेही तुम्ही तुमच्या नखांवरील नेलपॉलिश काढू शकता. मात्र त्याआधी कमीत कमी वीस मिनीट्स नखं कोमट पाण्यात बुडवणं गरजेचं आहे. त्यानंतर नखांवर कापसाच्या मदतीने लिंबाचा रस लावा आणि काही सेंकदांनी नखांवरील नेलपॉलिश स्वच्छ करा.
  • टुथपेस्ट
    घरातील तुमच्या टुथपेस्टनेही तुम्ही नेलपॉलिश काढू शकता. यासाठी कोणताही फ्लेवर नसलेली साधी टुथपेस्ट नखांवर लावा आणि हलक्या हाताने कापसाने रगड़ून नखं स्वच्छ करा. नखांवरील नेलपॉलिश काढण्याचा हा एक सोपा आणि सुरक्षित उपाय आहे.

Story img Loader