चेहऱ्यावरील डाग हे चेहऱ्याची सुंदरता कमी करतात. यातून तुमचे आरोग्य ठीक नाही, असे देखील समजून येते. हे डाग दूर करता येऊ शकतात. केवळ त्यासाठी हे डाग येण्यामागील कारणे माहिती असणे गरजेचे आहे. आधी आपण डाग येण्यामागील कारणांबाबत जाणून घेऊया, नंतर ते दूर करण्यासाठी उपाय जाणून घेऊया.
चेहऱ्यावर डाग येण्यामागे ही कारणे आहेत
- अधिक काळ उन्हात राहणे
- धुम्रपाण करणे
- गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन केल्याने
- अँटिबायोटिक गोळ्यांचे अधिक सेवन
- शरिरात विटामिनची कमतरता
चेहऱ्यावरील डाग हटवण्यासाठी करा हे उपाय
1) हळद पावडरचा वापर
औषधीय गुणधर्मांनीयुक्त हळद ही त्वचेसाठी फायदेशीर आहे. त्वचेला उजळ देण्यासाठी हळदीचा वापर होतो. हळद अन्न पदार्थांना चव तर देतेच सोबत ती त्वचेची समस्या दूर करण्यात देखील मदत करते. चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधामध्ये एक चमचा हळद मिसळून प्या. याने चेहऱ्यावरील डाग कमी करण्यात मदत होईल.
या उपचराबरोबरच अजून एक उपाय आहे. लिंबू आणि मधासोबत हळदीचे पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा. १५ ते २० मिनिटांनंतर चेहरा ताज्या पाण्याने स्वच्छ धुवा. हा उपाय रोज करा. या उपायाने चेहऱ्यावरील डाग दूर होण्यात मदत होऊ शकते.
२) कोरफड आणि मधाचा वापर
कोरफेडचे जेल आणि मधाचे मिश्रण १० मिनिटांसाठी ठेवा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि ती २५ ते ३० मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. १५ दिवस हा उपाय करा. याने चेहऱ्यावरील डाग दूर होण्यास मदत होईल.
३) संतऱ्याची साल आणि चंदन पावडर
संतऱ्याच्या सालीने तयार झालेले पावडर, चंदनाचे पावडर, गुलाब जल, मध आणि कोरफडचे मिश्रण करून बनवलेली पेस्ट लावा. या उपायाने तुमची त्वाचा उजळेल आणि डाग देखील दूर होण्यास मदत होईल.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. हे उपाय वापरण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)