भारतातील सण मिठाईसह पूर्ण होतचं नाही. भारतीय मिठाईमध्ये आता हटके प्रयोगही होऊ लागले होते. हलवा, खीर आणि लाडू याशिवाय हटके मिठाई म्हणून लोकप्रिय फूड ब्लॉगर शिवेश भाटिया यांनी इंस्टाग्रामवर ‘मोतीचूर चीजकेक’ ची रेसिपी शेअर केली.शिवेशने रेसिपीचा व्हिडीओ शेअर करत लिहिले “माझे आवडते लाडू म्हणून चीजकेक !! सणासुदीचा सिजनमध्ये मी भारतीय अभिजात गोष्टी सादर करण्यास खूप उत्साहित आहे जे मला आवडतेही. फ्यूजन दिसते तितके हे स्वादिष्ट आहे – मोतीचूर चीजकेक! यात अंड नाही, हे स्वादिष्ट आहे आणि जर आपण या दिवाळीत आपल्या प्रियजनांसाठी काहीतरी खास बनवण्याचा विचार करत असाल तर ते परिपूर्ण मिष्टान्न आहे. ”
बेस साठी साहित्य
दीड कप बारीक केलेलं बिस्किट
१/४ कप पिस्ता
१/२ कप मेल्ट केलेलं तूप
बूंदी साठी
१/२ कप बेसन
१/३ कप पाणी
१ टीस्पून ऑरेंज फूड कलर
साखरेच्या पाकसाठी
१/३ कप पाणी
१/२ कप साखर
१ टीस्पून गुलाब पाणी
ऑरेंज फूड कलर
स्टफिंगसाठी
३/४ कप व्हिपिंग क्रीम
दीड टीस्पून कॉर्नफ्लोर
२ कप क्रीम चीज
१/४ टीस्पून वेलची
थोडसं केशर
दीड कप कंडेन्स्ड दूध
कृती
बेसन आणि पाणी वापरून बुंदी बनवायला सुरवात करा. छान चव मिळवण्यासाठी त्यांना शुद्ध तुपात तळून घ्या आणि एकदा तयार झाल्यावर, त्यांना गुलाबपाण्यात टाकलेल्या साखरेच्या पाकात बुडवा.
चीजकेकमध्ये क्रीम चीज आणि व्हिपिंग क्रीम देखील असते.
केशर बरोबर थोडी वेलची आणि बिस्किट बेस मध्ये थोडे तूप घाला.
पावडर पिस्तासाठी, आपल्याला आपले पिस्ता फूड प्रोसेसरमध्ये बारीक पावडर होईपर्यन्त मिक्स करा. एकदा पूर्ण झाल्यावर, चीजकेकच्या बेससाठी बारीक केलेल्या बिस्किट आणि तुपामध्ये टाका.
प्रो-टीप
आपण मऊ क्रीम चीज वापरणे अत्यावश्यक आहे, कारण ते चीजकेकला गुळगुळीत आणि रेशमी पोत देते. जर तुम्ही कोल्ड आणि सॉफ्टेन्स्ड क्रीम चीज वापरले तर तुमच्या मिश्रणात भरपूर गोळे असतील आणि तुम्ही कधीही गुळगुळीत सुसंगतता गाठू शकणार नाही.