चेहऱ्यावर मुरुम येणे ही एक अशी समस्या आहे की केवळ चेहरा खराब दिसत नाही तर त्यांच्यामुळे चेहऱ्यावर वेदना देखील होतात. बहुतेकदा तेलकट त्वचा असणाऱ्यांना यांचा भरपूर त्रास होतो. परंतु काही महिलांना मासिक पाळीदरम्यान पिंपल्सचा त्रास जाणवतो. मासिक पाळीच्या दरम्यान होणाऱ्या या पिंपल्सला ‘मेन्स्ट्रुअल अ‍ॅक्ने’ असे म्हणतात. हे पिंपल्स चेहऱ्यावर खूपच वाईट दिसतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मासिक पाळी दरम्यान बऱ्याचदा महिलांना मूड स्विंग्स, क्रॅम्प आणि पोटदुखीचा त्रास जाणवतो. परंतु काही महिला यावेळी पिंपल्समुळे देखील हैराण असतात. मासिक पाळीत चेहऱ्यावर पुरळ येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हार्मोन्समधील बदल. यावेळी आपल्या हार्मोन्समध्ये वेगाने चढ-उतार होत असतात. पाळी सुरु होण्याआधी अ‍ॅस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचा स्थर खालावतो. अशावेळी आपल्या त्वचेतून मोठ्या प्रमाणावर सेबमचा स्त्राव होतो. सेबम हे नैसर्गिक तेल आहे ज्यामुळे त्वचा तेलकट होते. यामुळे त्वचेवरील छिद्रे बंद होतात आणि त्वचेवर पुरळ येतात.

तुम्ही देखील प्रत्येक महिन्यात मासिक पाळीमुळे येणाऱ्या पिंपल्सने हैराण आहात, तर काही प्रभावी टिप्सचा वापर करून तुम्ही या समस्येपासून स्वतःची सुटका करू शकता.

Health Tips : त्वचेसाठी अत्यंत गुणकारी आहे Tea Tree oil; ‘या’ समस्यांपासून करते रक्षण

मासिक पाळीदरम्यान येणाऱ्या पिंपल्सपासून कशी करावी सुटका ?

दिवसातून दोन वेळा चेहरा ऑइल फ्री फेस वॉशने स्वच्छ करावा. चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही नैसर्गिक होममेड टोनरचा वापर करू शकता. टोनर चेहऱ्यावरील पिंपल्सपासून आपली सुटका करेल.

निरोगी आहार घेतल्याने पिंपल्सपासून सुटका मिळवता येईल. आहारात गोड पदार्थ खाणे टाळावे. तसेच मासिक पाळीदरम्यान तेलकट पदार्थ खाल्ल्याने देखील पिंपल्सचा त्रास जाणवू शकतो. पिंपल्सपासून मुक्त होण्यासाठी तुमचा आहार खूप प्रभावी ठरतो. आहारात भरपूर हिरव्या भाज्या आणि ज्यूस यांचा समावेश करा.

ताण-तणावापासून दूर राहा. तणावसुद्धा चेहऱ्यावर पिंपल्स वाढण्याचे एक मुख्य कारण ठरते. तणावामुळे तुमच्या शरीरात अनेक प्रकारचे हार्मोन्स तयार होतात ज्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

Health Tips : हिवाळ्यात रात्री स्वेटर घालूनच झोपताय? होऊ शकतं मोठं नुकसान; आजच बदला सवय

चेहऱ्यावरील पिंपल्सना वारंवार स्पर्श करणे टाळा, असे केल्याने पिंपल्सचा त्रास वाढतो.

(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया उपाय वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tired of menstrual acne try these remedies to cure period pimples pvp