हृदयविकार हे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात मृत्यूचे सर्वात मोठे कारण आहे. हृदयाशी संबंधित रोगांचा धोका वाढतो जेव्हा खाण्याच्या अस्वस्थ सवयी असतात. याशिवाय, धूम्रपान, अल्कोहोलचे अतिसेवन, लठ्ठपणा, तणाव, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि वृद्धत्व यासह हृदयरोग देखील होऊ शकतो. दरवर्षी या दिवशी म्हणजेच २९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. जेणेकरून लोकांना या प्राणघातक आजाराबद्दल जागरूक केले जाऊ शकते. याकरिता तुम्ही हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी तुमच्या लाईफस्टाइल हे १० बदल केले पाहिजे. कोणते बदल केले पाहिजे हे जाणून घेऊयात.

सक्रिय रहा

आहार घेऊन झाल्यावर तुम्ही ३० मिनिटे बसल्यानंतर तुमच्या शरीरातील चयापचय प्रक्रिया ९० टक्के हळू काम करते. बसल्यामुळे तुमच्या शरीरातील एन्झाइम कमी होऊ लागतात. जे तुमच्या धमन्या आणि स्नायूंमधील खराब चरबी काढून टाकू शकतात. दोन तासांनंतर चांगले कोलेस्टेरॉल २० टक्क्यांनी कमी होते.

Fan came inside the stadium to meet Babar Azam
बाबर आझमला भेटायला आला चाहता, हारिस रौफने पाहिलं आणि…. VIDEO व्हायरल
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
indias cheapest bikes motorcycles with 110km mileage
होंडा शाइनसह ‘या’ ३ बाईक्समध्ये मिळणार भरपूर मायलेज अन् किंमत ७० हजारांपेक्षा कमी
Health centers should be capable of diagnosing cancer
‘कर्करोग निदानासाठी आरोग्य केंद्रे सक्षम हवीत’
Success Story Of Nikunj Vasoya
Success Story: शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा अंबानींच्या प्री-वेडिंगमध्ये जेवण बनवतो; वाचा थक्क करणारा ‘त्याचा’ प्रवास
If you are an iPhone 15 user, should you upgrade to iPhone 16
iPhone 15 Vs iPhone 16: iPhone 15 होणार २० हजार रुपयांनी स्वस्त? कोणता फोन ठरेल तुमच्यासाठी बेस्ट?
BSNL unveils 365 day plan
वर्क फ्रॉम होम करताय? तुमच्यासाठी BSNL चा ‘हा’ रिचार्ज ठरेल बेस्ट? किंमत किती ? जाणून घ्या
Ice cream made from raw eggs
कच्च्या अंड्यांपासून बनवले जाणारे आईस्क्रीम आरोग्यासाठी योग्य आहे का? तज्ज्ञ काय सांगतात..

फायबरवर लक्ष केंद्रित करा

फायबरचे सेवन केल्याने पाचन तंत्राचे आरोग्य चांगले राहते. यामुळे शरीरातून अतिरिक्त कोलेस्टेरॉल आणि साखर काढून टाकते आणि तुमचे वजन नियंत्रणात राहते.

निरोगी आहाराचे करा सेवन

हृदयरोगा पासून बचाव तसेच निरोगी राहण्यासाठी तुम्ही काजू, बियाणांचे तेल, मासे हे पदार्थ खा. बेकरी उत्पादने, मार्जरीन, ट्रान्सफॅट्स असे पदार्थ खाणे टाळावे.

फळे आणि भाज्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही वनस्पती उत्पादने, विशेषत: रंगीबेरंगी फळे व हंगामी फळे ,भाज्या यांचे सेवन करावे. कारण हे हंगामी फळे आणि भाज्या फायटोन्यूट्रिएंट्समध्ये समृद्ध असतात. जे हृदयाचे आरोग्य ऑक्सिडेशनपासून वाचवतात.

हलके आणि साधारण अन्न शिजवा

तुमच्या आहारातील अन्न जर योग्य तापमान आणि योग्य पद्धतीत शिजवले जात नसेल तर ते हृदयरोगास कारणीभूत ठरू शकते. तसेच आपण मांस हे हल्ली बार्बेक्यू आणि तंदुरी करून खात असतो. मात्र हे प्रकार अन्नाचे घटक बदलू शकतात. यामुळे हानिकारक ग्लायकेशन तयार होतात आणि यामुळे हृदयरोगाचा धोका निरण होऊ शकतो. याकरिता तुम्ही नेहमी पुर्णपणे अन्न वाफवलेले, शिजवलेले अन्न खावे.

आपल्या पोटाच्या वाढता चरबीकडे लक्ष द्या

पोटातील चरबी हे हृदयरोगाचे सर्वात मोठे कारण आहे. त्यामुळे तुम्ही नेहमी तुमच्या पोटाच्या वाढत्या चरबीकडे लक्ष द्या.

धूम्रपान सोडा

अनेकजणांना धूम्रपान करण्याचे खूप व्यसन असते. तुम्ही जर सतत धूम्रपान करत असाल तर ते करणे सोडा. कारण धूम्रपान केल्याने तुमच्या शरीरात भरपूर मुक्त रॅडिकल्स तयार करते आणि हृदयाला हानी पोहोचवते.