शरीरासाठी र्नेसर्गिक आणि उत्साहवर्धक पेय म्हणजे लिंबूपाणी. सदोदित ताजेतवाने आणि फ्रेश राहण्यासाठी लिंबूपाण्याचे सेवन नियमित केलेले चांगले. लिंबू आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आणि लाभदायक आहे. लिंबात सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, तांबे, फॉस्फरस, क्लोरीन इत्यादी घटकांबरोबर प्रोटीन, जीवनस्तव क आणि ब असते. शरिरासाठी आवश्यक असणारी क जीवनसत्वाची कमतरता लिंबूपाणी सेवनाने भरून काढता येते.
लिंबूपाणी शरिराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबरोबरच पोटॅशिअमचीही गरज पूर्ण होते. पोटॅशिअममुळे आपल्या मेंदूला फायदा होतोच आणि रक्तदाबवरही ताबा ठेवता येतो. चहा कॉफीची सवय कमी करण्यासाठी लिंबूपाणी हा उत्तम उपाय आहे.
लिंबूपाणी सेवनाचा आणखी एक फायदा तो म्हणजे रक्तशुद्धी ज्यामुळे शरीर स्वस्थ राहण्यास मदत होतेच आणि शरीर ताजेतवाने राहते. जीवनसत्वाने भरपूर आणि लाभदायक असे हे लिंबूपाणी कधीही सेवन केले तरी चालते मात्र रात्री जेवणानंतर घेऊ नये. ते शरिरासाठी हानिकारक ठरू शकते.

Story img Loader