अंगावर चरबी वाढण्याची समस्या ही साधारण बाब बनली असून यामुळे अनेकजणण त्रस्त असतात. जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते. चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील मेदाचे म्हणजेच चरबीचे प्रमाण आटोक्यात असणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या सर्व रोगांचे मूळ अनावश्यक चरबीत आहे, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे.
लठ्ठपणामुळे अनेक घातक आजार होऊ शकतात. मधुमेह, रक्तदाब, पक्षाघात, कॅन्सर यांची सुरुवात चरबी जास्त असण्यातून होणे शक्य असते. त्यामुळे लठ्ठपणा कमी करण्यासाठी योगाचा आधार घ्यावा. योगामधील कपालभाती प्राणायामाने लठ्ठपणावर नियंत्रण मिळविणे सहजशक्य आहे. कपालभाती करण्याची विधी पुढीलप्रमाणेः
कपालभाती करताना पोट रिकामी असावे. प्रथम चटईवर बसा. बसल्यानंतर पोट सैल सोडा. आता जोरात श्वास बाहेर सोडा आणि पोटाला हिसका देऊन आत खेचा. श्वास बाहेर सोडणे आणि पोट आत खेचण्याची प्रक्रिया एकाच वेळी व्हावयास हव्यात. सुरुवातीला ही क्रिया १० ते १५ वेळा करा. हळू हळू ६० पर्यंत ही क्रिया वाढवू शकता. एकाच वेळी करण्यास जमत नसल्यास मधून मधून थोडी विश्रांती घ्या. या क्रियेमुळे फुफ्फुसाच्या खालील भागातील हवा आणि कार्बनडायऑक्साईड बाहेर निघेल. विज्ञानाने सिद्ध झाले आहे की कपालभातीने शरीरावरील अनावश्यक चरबी नष्ट होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा