नुकत्याच लॉंच झालेल्या रेडमी नोट १० टी ‘५-जी’चा (Redmi Note 10T 5G) आज देशामध्ये पहिलाच सेल होणार आहे. शाओमीच्या (Xiaomi) या रेडमी नोट १० टी ‘५ जी’ला एका ऑनलाईन इव्हेंटमध्ये लॉंच करण्यात आलं आहे. त्यामुळे आता रेडमी नोट १० टी ‘५-जी’चा सामना रियलमी ८ ५ जी (Realme 8 5G) आणि पोको एम ३ प्रो ‘५-जी’सोबत होणार आहे. रेडमी नोट १० टी ५ जी हा नोट १० सीरीजचा पाचवा स्मार्टफोन आहे. या सिरीजमध्ये रेडमी नोट १०, रेडमी नोट 10 प्रो, रेडमी नोट 10 प्रो मॅक्स आणि रेडमी नोट १० एस हे सर्व फोन रेडमी नोट 10 टी 5 जीच्या आधी लॉंच केले गेले आहेत.
Redmi चा हा पहिला 5G स्मार्टफोन
शाओमीचा (Xiaomi) सब ब्रँड असलेल्या रेडमीचा हा पहिला ५ जी स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये पोको एम 3 प्रो 5 जी सारखेच स्पेसिफिकेशन्स आहेत. मात्र, याच डिझाइन स्वतंत्र आहे. त्याचबरोबर या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ७०० एसओसी चिपसेट (MediaTek Dimensity 700 SoC), ट्रिपल रियर कॅमेरा मॉड्यूल आणि ९० हर्ट्ज डिस्प्ले देखील देण्यात आला आहे.
भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन्सपैकी एक
४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह असलेल्या रेडमी नोट १० टी ‘५-जी’ची किंमत १३,९९९ इतकी ठेवण्यात आली आहे. तर ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये इतकी ठेवली गेली आहे. विशेष म्हणजे हा भारतातील सर्वात स्वस्त ५ जी स्मार्टफोन्सपैकी एक आहे. हा फोन क्रोमियम व्हाइट, ग्रॅफाइट ब्लॅक, मॅटेलिक ब्लू आणि मिंट ग्रीन इतक्या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
आज म्हणजेच २६ जुलैपासून हा फोन अॅमेझॉन, एमआय डॉट कॉम, एमआय होम स्टोर्स आणि ऑफलाईन रिटेलर दुकानांमध्ये उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे, हा फोन तुम्ही एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड आणि ईएमआय ट्रँझॅक्शन्सद्वारे खरेदी केल्यास तुम्हाला १,००० रुपयांचा इन्स्टंट डिस्काउंट देखील मिळेल. नॉन-ईएमआय ट्रँझॅक्शनवर कोणतीही ऑफर देण्यात आलेली नाही.
Redmi Note 10T 5Gचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
‘रेडमी नोट 10 टी 5 जी’मध्ये ६.५-इंच फुल-एचडी+ डिस्प्ले ९० हर्ट्ज अडॅप्टिव्ह रिफ्रेश रेटसहित देण्यात आला आहे. या फोनच्या रियरमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. तर याचा प्रायमरी कॅमेरा ४८-मेगापिक्सल आहे. याचबरोबर यामध्ये २-मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आणि २-मेगापिक्सलचा १ डेप्थ सेन्सरदेखील देण्यात आला आहे. सोबतच, फोनच्या फ्रंटला सेल्फीसाठी ८-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.
‘रेडमी नोट 10 टी 5 जी’मध्ये १८ डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५,००० एमएएचची (5,000mAh) बॅटरी दिली गेली आहे. याचसोबत या फोनसोबत बॉक्समध्ये २२.५ डब्ल्यूच्या फास्ट चार्जर दिला जातो. याचसोबत या फोनला जॉईंट-माउंटेड फिंगर प्रिंट सेन्सर दिला गेला आहे.